हेल्थ / टोमॅटो, लसूण, अद्रकाचे करा जास्तीत जास्त सेवन, रोगांपासून वाचण्यासाठी वाढवा इम्युनिटी

  • लोकांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते, अशा लोकांना रोगांचा जास्त धोका असतो

दिव्य मराठी

Mar 21,2020 12:10:00 AM IST

तज्ज्ञ डॉक्टरांनुसार, ज्या लोकांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते, अशा लोकांना रोगांचा जास्त धोका असतो. अशा परिस्थितीत प्रतिकारशक्ती वाढवायला हवी. यासाठी, येथे नमूद केलेल्या काही गोष्टी तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात.


1. ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि संसर्ग रोखण्यास मदत करते. त्यात फायटोकेमिकल्स असतात जे शरीरातील विषाक्त पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. ब्रोकोलीमध्ये फोलेटचे प्रमाण जास्त असते जे मानसिक आरोग्यासाठीदेखील आवश्यक असते.

कसे खावे : सॅलड किंवा ऑमलेटमध्ये टाकून खावे. याची भाजी बनवा किंवा सूप बनवून घेऊ शकता.


2. टाेमॅटो
यात लाइकोपिन असते, जे शरीरात असलेल्या रॅडिकल्सला तटस्थ करते, जेणेकरून मुक्त रॅडिकल्स आपल्या शरीरास हानी पोहोचवू शकत नाहीत. हे वजन कमी करण्यास आणि आर्थस्ट्रिसिस रोखण्यात खूप मदत करते.

कसे खावे : टोमटोचे सॅलड बनवून खावे. याचा ज्यूसही बनवू शकता. शिवाय भाजी किंवा चटणी बनवूनदेखील खाऊ शकता.


3. लसूण

कच्चा लसूण प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. यात अ‍ॅलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियमसह ए आणि ई जीवनसत्त्वे असतात. बदलत्या हंगामात वेदना आणि अॅलर्जी कमी करण्यास याचे सेवन उपयुक्त ठरते. तुम्हाला सर्दी किंवा कोणत्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन झाले असेल तर नियमितपणे लसूण खाणे फायदेशीर ठरेल.

कसे खावे : रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी भाजून खावी. भाजी किंवा टोमॅटोच्या सूपमध्ये टाकूनदेखील खाऊ शकता.


4. अद्रक (आलं)

आलं शरीर निरोगी ठेवते. याचा गुणधर्म गरम असतो त्यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवण्याचा त्रास होत नाही. याच्या सेवनामुळे सांधेदुखीचा त्रास होत नाही. यात अँटीफंगल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे हे एका औषधासारखे काम करते.

कसे खावे: अद्रकचा चहा प्या. भाजीत टाकावे. मधासोबत अद्रकचा रस घेऊ शकता.


5. दालचिनी

दालचिनी शरीराला उबदार ठेवण्यासाठी ओळखली जाते. यामुळे सर्दीची समस्या राहत नाही. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. संसर्ग दूर ठेवते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, दालचिनी, तुळशीची पाने आणि लवंगांचा कोमट काढा प्या. यामुळे तापही नाहिसा होईल.

कसे खावे : चहा करून दिवसातून दोन वेळेस घ्या.


आवळा

एक ग्लास पाण्यात दोन चमचे आवळ्याचा रस आणि 1 चमचा मध टाकून प्या. हे शरीरासाठी चांगले असते. यासाठी २ आवळ्यांपासून रस तयार करून पाण्यात मिसळा व त्याचे सेवन करा.


लिंबू

संत्रा, मोसंबी आणि लिंबू ही फळे शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात सी जीवनसत्व असतात. लिंबाचा वापर पिंपल्स, ब्लॅकहेड्स, चेहऱ्यावरील सुरकुत्या अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी करण्यात येतो.


हळद

त्यात आढळणारे लिपोपालिस्केराइड घटक आपली रोगप्रतिकारक शक्ती बळकट करून आपल्याला आजारांपासून दूर ठेवते. याव्यतिरिक्त, अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्मदेखील यात आढळतात. हळद शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास उपयुक्त ठरते.


तुळशी

तुळशीच्या पानांचा रस सकाळी रिकाम्या पोटी प्या. यामुळे सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो, रोगप्रतिकार शक्ती सुधारते. शिवाय मानसिक ताणही कमी होतो. तुळशीची पाने, आले आणि काळ्या मिरीपासून तयार केलेला चहा खोकला आणि सर्दीमध्ये फायदेशीर ठरतो.


गुळवेल

पॉवर ड्रिंक म्हणून गुळवेलचा वापर केला जातो. गुळवेल रोगांशी लढण्याची शक्ती प्रदान करते. गुळवेलचा रस पिणेदेखील आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.


या गोष्टींची काळजी घ्या...

गरम पाणी प्यावे

शक्य तितके गरम पाणी प्या. गरम पाणी कफ, बद्धकोष्ठता, गॅस, लठ्ठपणा, टॉन्सिलच्या उपचारांमध्ये प्रभावी आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी डॉक्टरदेखील कोमट पाणी पिण्याचा सल्ला देत आहेत. गरम पाण्यात लिंबाचा रस पिणेदेखील फायदेशीर आहे. यामुळे, शरीरास आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन-सी मिळते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते.


कच्च्या भाज्या खाऊ नये

कधी कधी कच्च्या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात, परंतु या क्षणी कच्च्या भाज्या खाणे टाळा. तथापि चांगल्या पचनासाठी कच्च्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. या भाज्यात भरपूर फायबर असते. परंतु, कोरोना विषाणू संपूर्ण जगात पसरला आहे, तेव्हा कच्च्या भाज्यांचे सेवन टाळले पाहिजे. भाज्या चांगल्या धुवून शिजवल्या पाहिजेत.

अन्न चांगल्या प्रकारे शिजवा

चांगले शिजवलेले अन्न खायला हवे. निरोगी राहण्यासाठी संपूर्ण शिजवलेले अन्न अत्यंत महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा लोकांना वाटते की, जास्त शिजवलेल्या अन्नातून पौष्टिक घटक नष्ट होतात. त्यामुळे ते योग्य प्रकारे शिजवत नाहीत, त्यात जंतू लपलेले असतात. अर्धवट शिजल्याने ते पूर्णपणे मरत नाहीत. हेच गंभीर आजारांना कारणीभूत ठरते.

X