आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पंच शोधेल व्हायरस:केसांपेक्षा 30 पट बारीक नॅनोस्पंजच्या कणांनी कोरोना मारण्याची तयारी, हे व्हायरसला शोषूण नष्ट करेल 

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॅलिफोर्निया यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनुसार, नॅनोस्पंज कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी थेरेपीप्रमाणे काम करु शकते
  • संशोधकांनुसार, नॅनोस्पंज 90% पर्यंत व्हायरस संक्रमणाची क्षमता कमजोर करते

अमेरिकन संशोधकांनी फुफ्फुस आणि रोगप्रतिकारक पेशींना व्यापणारे स्पंज कण (नॅनोस्पंगेज) तयार केले आहेत. हे कण मानवी केसांच्या रुंदीच्या 30 पटींनी बारीक आहेत. हे कोरोना व्हायरसला आपल्याकडे आकर्षित करतात आणि ओढून घेतात. नॅनोस्पंज कोरोना व्हायरस आणि त्याचे विषारी घटक शोषून घेते. संशोधन करणार्‍या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथील संशोधकांचे म्हणणे आहे की हे कण कोविड -19 पासून बचाव करण्यासाठी थेरेपीप्रमाणे काम करतात. 

व्हायरसला 90 टक्के कमकुवत करते 
संशोधकांनुसार संशोधनातून असे दिसून आले आहे की नॅनोस्पॉन्जने कोरोनाव्हायरसला न्यूट्रिलाइज केले. असे केल्याने, व्हायरस मानवी पेशींमध्ये संक्रमित होऊ शकला नाही. हे लॅबमध्ये तयार केले गेले आहे, फुफ्फुस आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या पेशींसोबत बनवण्यात आले आहे. संशोधनादरम्यान, हे उघड झाले की हे विषाणूची लागण करण्याची क्षमता 90 टक्क्यांपर्यंत कमी करते. 

वैज्ञानिकांनी कोरोनाचा टार्गेट लक्षात घेतला 
संशोधक आणि नॅनो-अभियांत्रिकी तज्ज्ञ लियानफॅंग झांग म्हणतात की सामान्यत: औषध विकसित करणारे वैज्ञानिक विषाणूचे टार्गेट शोधतात. जेथे औषधांचा परिणाम होऊ शकतो. पण आमची पद्धत वेगळी आहे. कोरोना कोणत्या कोशिकेला संक्रमणासाठी लक्ष्य करते हे आम्ही शोधले आहे. फक्त त्याच एका सेलचे संरक्षण करण्यासाठी आम्ही काम केले आहे.

नॅनोस्पंजेस सायटोकाइन स्टॉर्मलाही कंट्रोल करते  
संशोधकांच्या म्हणण्यानुसार नॅनोस्पंज अशा प्रकारे विकसित केले गेले आहे की यामुळे आपल्या निरोगी पेशींना हानी पोहोचत नाही. ज्या पेशींना संक्रमण होते त्या पेशींचे हे संरक्षण करते. 

काही कोरोना रूग्णांमध्ये, शरीराची सुरक्षा करणारी रोगप्रतिकारक शक्ती उलट काम करण्यास सुरूवात करते आणि नुकसान होऊ शकते. या अवस्थेला सायटोकाइन स्टॉर्म असे म्हणतात. ज्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो. शरीराला नुकसान पोहोचवणाऱ्या अशा इम्यून कोशिकांनाही हे स्पंज शोषून घेऊन नष्ट करते. 

वेगवेगळ्या क्षमतांचे नॅनोस्पंज बनवले गेले

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, नॅनोस्पंजच्या आजूबाजूला एक पॉलिमरची कव्हरिंग आहे. जे फुफ्फुसांच्या बाह्य पेशींच्या मदतीने तयार केले जाते. संशोधकांनी वेगवेगळ्या क्षमतांचे नॅनोस्पंज विकसित केले आहेत. ज्याची टेस्टिंग सॉल्यूशनमधील कोरोना व्हायरसवर करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...