आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. सुनीता दुबे मेडिकल डायरेक्टर, डॉ. श्रॉफ चॅरिटी आय हॉस्पिटल, नवी दिल्ली
सर्वसाधारणपणे दृष्टी गमावण्याची भीती सर्वात जास्त असते. या भीतीपोटी लोक डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी आणि त्यांना हानीपासून वाचवण्यासाठी अनेक प्रकारच्या भ्रमांना बळी पडतात. पालकही नकळत चुकीची माहिती मुलांना देतात. योग्य माहिती असेल तरच डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेता येते. उदा. अनेक लोकांना असे वाटते की, चष्मा नेहमी परिधान करू नये, डोळ्यांना यापासून ब्रेक आवश्यक आहे, परंतु तसे नाही. त्याचप्रमाणे आजही गाजर हे डोळ्यांसाठी उत्तम अन्न असल्याचे म्हटले जाते. जगभरात १९ ते २५ मार्च या कालावधीत जागतिक ऑप्टोमेट्री सप्ताह आणि २३ मार्चला जागतिक ऑप्टोमेट्री दिन डोळ्यांच्या आरोग्याविषयी आणि त्यावर काम करणाऱ्यांसाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. आज आपण ज्यामुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते किंवा ते डोळे निरोगी ठेवतात, असे आपल्याला वाटते असे डोळ्यांशी संबंधित पाच महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे जाणून घेऊया.
चाळिशीनंतर कुणालाही होऊ शकतो माेतीबिंदू प्रश्न-१ डोळ्यांचे व्यायाम केल्याने चष्मा लागणार नाही का? उत्तर : डोळ्यांच्या व्यायामाने दृष्टीही सुधारत नाही आणि डोळ्यांचे आरोग्यही सुधारत नाही. तसेच यामुळे चष्मा घालण्याची शक्यता कमी होऊ शकत नाही. वास्तविक, नेत्रगोलकाचा आकार आणि डोळ्यांच्या ऊतींचे आरोग्य यासह अनेक गोष्टींवर दृष्टी अवलंबून असते. डोळ्यांचा व्यायाम केल्याने यापैकी कोणतेच महत्त्वाचे बदल करता येत नाहीत. प्रश्न-२ कमी प्रकाशातही वाचावे का? उत्तर : कमी प्रकाशात वाचन केल्याने दृष्टी किंवा आरोग्याला हानी पोहोचत नाही, परंतु डोळे लवकर थकतात. अशा परिस्थितीत वाचताना प्रकाश थेट पानावर पडेल असा प्रयत्न करा, हा सर्वोत्तम मार्ग आहे. प्रश्न-३ आपल्या डोळ्यांसाठी सर्वात अधिक लाभदायक काय असते? उत्तर : गाजरांमध्ये व्हिटॅमिन ए असते, ते डोळ्यांसाठी फायदेशीर असते, परंतु ताजी फळे आणि गर्द हिरव्या पालेभाज्या, त्यात सी आणि ईसारखी अधिक अँटीऑक्सिडेंट जीवनसत्त्वे असतात, त्यापेक्षा जास्त फायदेशीर असतात. अँटिऑक्सिडंट्स डोळ्यांचे मोतीबिंदू आणि वयानुसार येणाऱ्या कमकुवतपणापासून संरक्षण करतात. प्रश्न-४ नेहमी चष्मा घालणे चांगले नाही का? उत्तर : तुम्हाला दूरसाठी किंवा वाचनासाठी चष्मा किंवा लेन्स आवश्यक असेल तर ते नेहमी वापरा. चष्मा न लावल्याने डोळ्यांवर ताण येतो आणि त्यांना विश्रांती मिळण्याऐवजी लवकर थकवा येतो. तथापि, यामुळे डोळ्यांचे आजार किंवा दृष्टी कमी होण्याचा कोणताही धोका होणार नाही. प्रश्न-५ मोतीबिंदू कोणाला होतो? उत्तर : खरं तर मोतीबिंदू म्हणजे डोळ्यांच्या लेन्सवर होणारे क्लाउडिंग. वयाच्या चाळिशीनंतर शरीरावर दिसणाऱ्या लक्षणांपैकी हे एक लक्षण आहे. जसजसे वय वाढत जाते तसतसे हे क्लाउडिंग दाट होते. डोळ्यांची योग्य काळजी घेतली नाही तर कोणालाही ते होऊ शकते. याशिवाय एखाद्या व्यक्तीला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असे आजार असतील तर त्यांना मोतीबिंदूचा धोका जास्त असतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.