आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:वास घेण्याच्या घटत्या क्षमतेचा संबंध या आजारांशीही आहे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वास घेण्याच्या घटत्या क्षमतेचा संबंध कोरोनाशीच नसतो...

चव व वास घेण्याची क्षमता कमी होणे हे कोरोनाचे मुख्य लक्षण आहे, परंतु वास घेण्याची क्षमता कमी होणे हे केवळ कोरोनाच नव्हे, तर इतर अनेक रोगांचेही लक्षण असू शकते. अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियनच्या मते, ज्या वृद्धांमध्ये वास घेण्याची क्षमता कमी आढळली त्यांच्यात पुढील १० वर्षांत मृत्यूचा धोका ५०% जास्त होता. तथापि, कधी कधी ही क्षमता सामान्य सर्दीमध्येही कमी होते.

इतर आजार
वास घेण्याची कमी क्षमता हे अल्झायमर, स्किझोफ्रेनिया किंवा आॅटो इम्युन आजाराचे लक्षण असू शकते. हे विकार मेंदूच्या वास घेण्याच्या भागाला संकुचित करतात किंवा त्यावर परिणाम प्रभावित करतात. पार्किन्सन फाउंडेशनच्या मते, या आजाराने ग्रस्त बहुतेक लोकांची वास घेण्याची क्षमता कमी होते. याला हायपोस्मिया म्हणतात. या प्रकरणात तो गंभीर धोकाही ठरू शकतो.

बुकलेट टेस्ट
यात अनेक पानांची पुस्तिका असते, त्यात वैशिष्ट्यपूर्ण गंधाने भरलेले छोटे फुगे असतात. पीडिताला प्रत्येक पान खरडायला आणि वास ओळखण्यास सांगितले जाते. त्यांना वास येत नसेल किंवा ते चुकीच्या पद्धतीने ओळखत असतील तर ते वास घेण्याच्या घटत्या क्षमतेचे लक्षण मानले जाते. ही चाचणी नाक, कान आणि घशाच्या तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच करावी.

महिलांमध्ये वास घेण्याची क्षमता अधिक
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये वास घेण्याची क्षमता अधिक असते. गर्भवतीमध्ये ही क्षमता आणखी जास्त असते.

डॉ. मनोज शर्मा
सिनियर कन्सल्टंट इंटर्नल मेडिसिन, फोर्टिस हॉस्पिटल

बातम्या आणखी आहेत...