आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यायाम:चाळिशीनंतर घटणारे संतुलन सुधारतो टो-रेज व्यायाम, रक्तप्रवाहात सुधारणा होईल

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूव्हमेंट वॉल्ट हेल्थ चेनचे संस्थापक आणि फिजिओथेरपिस्ट ग्रेसन विकहॅम यांच्या मते, आठवड्यातून किमान २ ते ३ सेट चो-रेज व्यायाम केल्यास चाळिशीनंतर घटणारे शरीराचे संतुलन सुधारू शकते. पायाचे स्नायू मजबूत होतात. हृदयाला रक्तपुरवठा वाढतो.

असे करा
-जमिनीवर सरळ उभे राहा.
-आता दोन्ही पायांची बोटे हळूहळू वर करा. टाचाच जमिनीवर राहाव्यात.
-३ ते ५ सेकंद थांबा.
-१५ ते २० वेळा पुन्हा करा.

गुडघा दुखापतीचा धोका घटतो
स्नायू मजबूत होतात - नडगीच्या वरच्या बाजूला आढळणारे टिबिअलिस स्नायू पायाची बोटे वाढवण्यास मदत करतात. हे स्नायू जितके मजबूत असतील तितकी गुडघा आणि घोट्याला दुखापत होण्याची शक्यता कमी असते.
हृदयात रक्तप्रवाह वाढतो - पाय आणि घोट्याच्या आजूबाजूच्या वाहिन्यांना गुरुत्वाकर्षण आणि हृदयापासून अंतर यामुळे रक्त परत पाठवण्यात अडचण येते. टो-रेजिंग व्यायामामुळे हे स्नायू मजबूत होतात.

बातम्या आणखी आहेत...