आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोप:झोपण्याआधी डीप ब्रीदिंग व बाळास कवटाळल्यास चांगली झोप लागते

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अपुऱ्या झोपेमुळे मेंदूची इनपुट ग्रहण करण्याची क्षमता प्रभावित होते, गोष्टी स्मरणात ठेवणे कठीण जाते

कमी वा अपुऱ्या झोपेमुळे मेंदूची इनपुट ग्रहण करण्याची क्षमता प्रभावित होते. मेंदू दिवसा शिकलेल्या गोष्टींवर चांगल्या प्रकारे काम करत नाही. गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचणी येतात. तसेच चांगली झोप मेंदूत तयार हाेणाऱ्या टॉक्सिनला दूर करते. तर अपुऱ्या झोपेमुळे नैराश्य, हाय बीपी, मायग्रेन इत्यादींची धोका वाढताे. जर चांगल्या झोपेसाठी त्रस्त असाल तर या पद्धती स्वीकारू शकता.

बॉडी स्कॅन : हेही एक प्रकारचे माइंडफुलनेस मेडिटेशन आहे बॉडी स्कॅन माइंडफुलनेस मेडिटेशन टेक्निक आहे. माइंडफुलनेस मेडिटेशन झोपेत सुधारणा करते. ते एंग्झायटी निर्माण करणाऱ्या विचारांची मालिका शांत करते. डोळे बंद करा. आता डोक्यापासून शरीराला स्कॅन करणे सुरू करा. जेथे वेदना वा तणाव आहे त्याची जाणीव करा. आता मानेपासून छाती, पोट, हिप्स, पाय व पुन्हा बोटांपर्यंत जा. आता तसेच बोटांपासून सुरू करून डोक्यापर्यंत जा. असे पाच वा सहा वेळा करा.

डीप ब्रीदिंग : १० मिनिटे करा झोपण्याआधी जर १० मिनिटे डीप ब्रीदिंग केली तर हार्टरेट संतुलित होते. मंेदू शांत होतो. अनियंत्रित विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होते. एंग्झायटी व तणाव वाढणारे हार्मोनची पातळी घटते.

अॅक्युप्रेशर : यामुळे झोप येणारे हार्मोन वाढतात पारंपरिक चायनीज पद्धतीत अनमिअन चा अर्थ होतो “शांततेने झोप’. अनमिअन एक्यू पॉइंट कानाच्या पाळीमागे डोक्याच्या हाडाजवळ असतात. बिझाण्यावर पडल्यानंतर बोटाने हे पॉइंटची काही वेळ हळहळू मसाज करा. २०१३ आणि २००९ मध्ये केलेल्या काही संशोधनात स्पष्ट झाले की, या पॉइंट्सची मसाज केल्याने इन्सोम्नियाच्या समस्येपासून दिलासा मिळतो. हे पॉइंट काल्पनिक विचारांना शांत करतात.

हग थेरपी : तणाव हार्मोन कोर्टिसोलची पातळी घटवताे जेव्हा तुम्ही एखाद्याला मिठी मारता तेव्हा आपल्या रक्त व सलायवा दोन्हीत तणाव वाढवणाऱ्या हार्माेनची पातळी घटते. हे हार्मोन एग्झायटी निर्माण करते यामुळे विचार अनियंत्रित होऊ लागतात. जर तुम्ही एकटे असाल तर उशीलाही मिठी मारून पडू शकता. २०२० चे संशोधन सांगते की, स्ट्रेस घटवणाऱ्या पाच पद्धती (चेंडू दाबणे, संगीत ऐकणे इत्यादी)मध्ये उशीला मिठी मारणे सर्वात चांगले असते.

बातम्या आणखी आहेत...