आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलेस्टेरॉल:शरीरातील कोलेस्टेरॉल घटवणारे आहाराचे सूत्र,  रेड मीट आणि प्रोसेस्ड डेअरी प्राॅडक्ट हानिकारक

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिका व युरोपमध्ये अनेक ठिकाणी हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचे प्रमाण कमी झाले. लोकांच्या धमन्यांमध्ये प्लेकचे प्रमाणही खूप कमी असल्याचे आढळले. रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होण्याला अॅथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. हृदयासंबंधी विविध आजारांचे हे मुख्य कारण आहे. लोकांच्या आहारात रेड मीट व मांसाहार घटणे हे त्याचे कारण असल्याचे आढळले. फ्रेमिंगहॅम हार्ट स्टडी या संशोधनात आढळून आले की, रक्तातील कोलेस्टेरॉलचा आहाराशी जवळचा संबंध आहे. व्यक्ती जे खाते ते कोलेस्टेरॉलची पातळी वाढवू व कमी करू शकते.

-कोलेस्टेरॉल म्हणजे काय : अमेरिकेतील एमोरी युनिव्हर्सिटीचे डॉ. लॉरेन्स स्पर्लिंग यांच्या मते, कोलेस्टेरॉल हा मेणासारखा घटक आहे, त्याचा वापर शरीर हार्मोन्स बनवण्यासाठी व पेशींच्या भिंती मजबूत करण्यासाठी करते, पण शरीराला त्याची फार कमी प्रमाणात गरज असते.

आहार आणि योगासनांद्वारे कोलेस्टेरॉल कसे घटवावे? -आहारात फायबरचे प्रमाण वाढवा : क्लीव्हलँड क्लिनिकच्या डॉ. लेस्ली चो यांच्या मते, रोजच्या आहारात सुमारे २५ ग्रॅम विद्राव्य फायबरचे लक्ष्य ठेवा. यासाठी आहारात दररोज किमान २ फळे, संपूर्ण धान्य, पालेभाज्या, मूठभर नट्स इ.चा समावेश करणे गरजेचे आहे. फायबर शरीरातून वाईट कोलेस्टेरॉल गोळा करून ते काढून टाकते.

-योग सर्वात लाभदायक : २०२० मध्ये जनरल सिस्टिमॅटिक रिव्ह्यूत प्रकाशित संशोधनानुसार, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी योग सर्वात प्रभावी आहे. यासाठी कपालभाती, चक्रासन, शलभासन, सर्वांगासन इ. योगासने करता येतात.

बातम्या आणखी आहेत...