दिव्य मराठी विशेष : उशिराच नव्हे, लवकर झोपल्यानेही हृदयविकाराचा धोका

  • नियमित वेळेच्या अर्धा तास उशिरा झोपल्यास वाढतो रेस्टिंग हार्ट रेट

प्रतिनिधी

Mar 26,2020 01:20:26 PM IST

न्यूयार्क : अनियमित झोप झाल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. संशोधकांचे म्हणणे आहे की, रोज रात्री कमीत कमी ७ तासांची झोप घ्यायला हवी. असे न झाल्यास मधुमेह, स्ट्रोक आणि कार्डिओव्हेस्क्युलर होऊ शकतो. जर्नल नेचरमध्ये प्रसिद्ध संशोधनात म्हटले आहे की, अनियमित झोप व रेस्टिंग हार्ट रेट (आरएचआर)च्या अभ्यासात आढळले की, रोज झोपण्याच्या वेळेच्या फक्त ३० मिनिटे उशिरा झाेपल्यास रेस्टिंग हार्ट रेट पुढील दिवसांत उच्च होतो. भारतीय वंशाचे संशोधक व अमेरिकेतील नोट्रे डॅम विद्यापीठाचे नितेश चावला हेदेखील संशोधनात सहभागी होते.


असे केले संशोधन


संशोधन करणाऱ्या टीमने चार वर्षांपर्यंत ५५७ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची माहिती गोळा करत विश्लेषण केले. त्यांनी २ लाख ५५ हजार ७३६ स्लीप सेशनची नोंद केली. यामुळे झोपण्याची वेळ, झोप आणि रेस्टिंग हार्ट रेट मोजण्यात आले. आश्चर्य म्हणजे नियमित वेळेवर झोपणारे वेळेआधी झोपले तेव्हाही आरएचआर वाढल्याचे आढळले. अर्ध्या तासाआधी झोपल्याने आरएचआर वाढल्याचे दिसले.


यांच्यासाठी वेळेवर झोपणे आव्हानच


झोपण्याच्या चांगल्या सवयीत २४ तासांची बायोलॉजिकल ऱ्हिदम, औषधी आणि जीवनशैलीची महत्त्वाची भूमिका असते. पाळ्यांमध्ये काम करणारे आणि सतत प्रवास करणाऱ्यांना रोज रात्री ठरावीक वेळी झोपणे एक आव्हानच असते.

X