आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्करोगामुळे जगभरात दरवर्षी एक कोटी, तर हृदयविकाराच्या झटक्याने १.८ कोटी लोकांचा मृत्यू होतो. तरुणांतही हा आजार सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत जाणून घ्या, हे आजार आपल्याला होऊ नयेत म्हणून काय करावे… ही आहेत अनेक मोठ्या आजारांपासून वाचवू शकतील अशी आरोग्याची सूत्रे…
१) मधुमेह
सर्व वयोगटांतील लोकांनी आहारात सॅलड अवश्य घ्यावे
मधुमेहाची चिंताजनक बाब म्हणजे ५०% रुग्णांमध्ये त्याची लक्षणे दीर्घकाळ दिसून येत नाहीत. डाळी, भाज्या, सॅलड, हिरव्या भाज्यांचा आहारात अधिक समावेश करा. कारण त्यात प्रथिने आणि फायबर असतात, ते इन्सुलिन सक्रिय ठेवण्यासाठी आणि ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक असतात. आठवड्यातून १५० मिनिटे व्यायाम कार, खेळा.
डॉ. हिमिका चावला
सीनियर कन्सल्टंट, PSRI हॉस्पिटल, नवी दिल्ली
२) हृदय : याच्या उत्तम आरोग्याचे हे सुवर्ण सूत्र, हृदयविकाराचा धोका ५० टक्क्यांनी कमी करते
GRIST हे हृदयाच्या आरोग्याचे अचूक सूत्र आहे. ते खूप सोपे आहे. ते काय आहे आणि कसे कार्य करते ते समजून घ्या-
Get fresh air म्हणजे ताजी हवा घ्या ः ताजी हवा हृदयाची कार्यप्रणाली सुधारते. यासाठी चालणे, ट्रेकिंग, बागकाम अशी कामे लाभदायक ठरतात.
Remot sacrifice म्हणजे रिमोटपासून दूर राहणे ः दररोज ४ तासांहून अधिक टीव्ही पाहणाऱ्यांना हृदयरोगाचा धोका जास्त असतो. त्यामुळे रिमोटपासून दूर राहावे.
Improve dental hygiene म्हणजे दंत आरोग्याकडे लक्ष देणे ः दातांचे अनारोग्य हृदयाला धोक्यात आणते. हिरड्यांच्या आजाराच्या जिवाणूंमुळे हृदयविकाराचा धोका असतो.
Superfoods are good म्हणजे सुपरफूड्स लाभदायक ः हळद, आवळा, बीटरूट, मखना आणि भरड धान्य हृदयासाठी अत्यंत लाभदायक आहे. त्यांचा आहारात समावेश करा.
Time your calories म्हणजे कॅलरीजची वेळ ठरवणे : सूर्यास्तानंतर आपले चयापचय मंदावते, म्हणून रात्री पचनास जड पदार्थ असलेले जेवण टाळा.
डॉ. रमाकांत पांडा चेअरमन, एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, मुंबई
३) कर्करोग
फास्ट फूड कमी करा, धोका ३०% घटेल
स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि पुरुषांमध्ये तोंडाचा व फुप्फुसाचा कर्करोग सर्वात सामान्य आहे. कोलन कॅन्सरचे रुग्णही झपाट्याने वाढत आहेत. ज्या माता पुरेशा प्रमाणात स्तनपान करवतात त्यांना कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. कोलन कॅन्सरच्या वाढत्या केसेसचे कारण म्हणजे अन्नामध्ये वाढणारे फास्ट फूड आणि पॅकबंद अन्न. फास्ट फूड कमी केले तर कर्करोगाचे प्रमाण ३०% पर्यंत कमी होऊ शकते.
डॉ. सुरेश अडवाणी
भारताचे पहिले ऑन्काॅलॉजिस्ट
४) न्यूरो
महिलांनी सकाळच्या उन्हात रोज २० मि. जावे
स्त्रियांना मणक्याशी संबंधित न्यूराॅलॉजिकल समस्यांचा धोका जास्त असतो. याचे कारण कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारा ऑस्टिओपोरोसिस हा हाडांशी संबंधित आजार आहे. विशेषतः रजोनिवृत्तीनंतर. चाळिशीनंतर महिलांनी पुरेसे व्हिटॅमिन डी आणि खनिजे मिळण्याची अधिक काळजी घेतली पाहिजे. व्हिटॅमिन डीसाठी दररोज सकाळी किमान २० ते २५ मिनिटे हलक्या सूर्यप्रकाशात घालवायला हवीत.
डॉ. संदीप वैश्य
एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर,
न्यूरो सर्जरी, फोर्टिस हॉस्पिटल
५) हाडांचे आरोग्य : लिंबूवर्गीय फळे नेहमी खा, हाडे ठिसूळ होत नाहीत हाडे जिवंत ऊती आहेत. ती नियमितपणे तुटतात आणि तयार होतात. नवीन ऊतींची निर्मिती तुटलेल्या ऊतींपेक्षा कमी होते तेव्हा हाडे कमकुवत होतात. जास्त वेळ बसल्यामुळे नवीन ऊतींची निर्मिती कमी होते आणि हाडे कमकुवत होतात. लिंबूवर्गीय फळे हाडांसाठी सर्वोत्तम आहेत. कारण त्यात व्हिटॅमिन सी असते, ते हाडांची झीज टाळण्यास मदत करते. डॉ. अशोक राजगोपाल ग्रुप चेअरमन, इन्स्टिट्यूट ऑफ मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर अँड ऑर्थोपेडिक्स, मेदांता, गुरुग्राम
६) किडनी
रात्री ८ नंतर जेवण करणे टाळावे
किडनी खराब होणे किंवा तिचे नुकसान होण्यासाठी तीन गोष्टी सर्वात जास्त जबाबदार असतात - मधुमेह, उच्च रक्तदाब आणि धूम्रपान. जेवणात दररोज एक चमच्यापेक्षा जास्त मीठ घेऊ नका. कारण पदार्थांमध्येही नैसर्गिक मीठ असते. रक्तदाब वाढण्यामागे मीठ हे एक प्रमुख कारण आहे. रात्री ८ नंतर खाऊ नका. कारण संध्याकाळी ६ नंतर आपली चयापचय क्रिया मंदावते.
डॉ. अनंत कुमार
किडनी ट्रान्सप्लांट सर्जन मॅक्स हॉस्पिटल, दिल्ली
७) रक्दाब
आपल्या छंदाला वेळ द्या, रक्तदाब सुधारेल
हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि किडनीशी संबंधित आजारांमागे रक्तदाब हे प्रमुख कारण आहे. आहार आणि वजन नियंत्रण याशिवाय एखादा चांगला छंद नक्कीच अंगीकारावा. उदा. गाणे-संगीत किंवा खेळ. कारण आपण आपल्या छंदाला वेळ देतो तेव्हा आनंद मिळतो. यातून तयार होणारे डोपामाइन हार्मोन तणाव कमी करते आणि उत्साह वाढवते. त्याचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो.
डॉ. अजित मेनन
कार्डिओलाॅजिस्ट, लीलावती हॉस्पिटल, मुंबई
धावणे हा एक साधा व्यायाम आहे, परंतु त्याचे फायदे अनंत आहेत. जे लोक आयुष्यभर धावतात ते वयाच्या ७५ व्या वर्षीही २५ व्या वर्षीप्रमाणे तंदुरुस्त राहता येते. ते तुमची पाठ, गुडघे आणि पचनासाठी चांगले असते. धावण्याने हृदयविकाराचा धोका ३०% आणि कर्करोगाचा धोका २३% कमी होतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.