आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेल्थ मॅसेज:कोरोनाच्या भीतीने ब्रेस्टफीडिंग करणे बंद करू नये, अन्यथा 14 पट वाढू शकतो बाळाच्या मृत्यूचा धोका

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रेस्टफीडिंग केल्याने पसरत नाही कोरोना व्हायरस

जगभरात 54.88 लाखांपेक्षा जास्त लोक कोविड-19 ने संक्रमित झाले आहेत. या व्हायरसने ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या मातांच्या मनातही एक भीती निर्माण केली आहे. ती म्हणजे बाळाला अंगावरचे दूध पाजल्याने कोरोना संक्रमण तर होणार नाही ना. याच भीतीपोटी अनेक देशामध्ये बाळाने जन्म घेताच त्याला आईपासून वेगळे ठेवले जात आहे. याचा फायदा दुधाचे सबस्टिट्यूट बनवणाऱ्या कंपन्या घेत आहेत. या सर्व घडामोडींमध्ये एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. विशेषतः अशा मातांसाठी ज्यांना इच्छा असूनही त्या आपल्या बाळाला कोरोना व्हायरसच्या भीतीने ब्रेस्टफीडिंग करत नाहीयेत.

ब्रेस्टफीडिंग केल्याने पसरत नाही कोरोना व्हायरस 

एका रिपोर्टनुसार, व्हायरसच्या भीतीने ब्रेस्टफीडिंग थांबवण्याची काहीही गरज नाही. आतापर्यंत ब्रेस्ट मिल्कच्या माध्यमातून हा व्हायरस पसरत असल्याचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. एवढेच नाही तर ज्या आईला कोविड-19 संक्रमण झाले आहे किंवा ज्यांच्यामध्ये याचे लक्षण आहे अशा माताही बाळाला ब्रेस्टफीडिंग करू शकतात. हा रिपोर्ट वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशन (डब्ल्यूएचओ), यूनायटेड नेशंस चिल्ड्रंस फंड (यूनिसेफ) आणि इंटरनेशनल बेबी फूड एक्शन नेटवर्क (आईबीएफएएन) ने जारी केला आहे.

ब्रेस्टफीड न केल्याने 14 पटीने वाढतो बाळाच्या मृत्यूचा धोका 

रिपोर्टनुसार, ज्या बाळांना ब्रेस्टफीडिंग केले जात नाही त्यांच्या मृत्यूचा धोका ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या बाळांच्या तुलनेत 14 टक्क्यांनी वाढतो. यामुळे अशाप्रकराची भीती बाळगून बाळाला ब्रेस्टफीडिंग न करणे त्यांच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते.

जगभरात ब्ररेस्टफीडिंग संदर्भात जागरूकता कमी

संपूर्ण जगात ब्रेस्टफीडिंगच्या महत्त्वाविषयी जागरूकता अत्यंत कमी आहे. डब्ल्यूएचओच्या रिपोर्टनुसार जगभरात 6 महिन्यांपर्यंत केवळ 41% बाळांना ब्रेस्टफीडिंग केले जाते. डब्ल्यूएचओच्या सर्व सदस्य देशांनी हा आकडा 2025 पर्यंत 50% करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

आईने घ्यावी अशाप्रकारे काळजी

- बाळाला स्पर्श करण्यापूर्वी हात साबण किंवा अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरने धुवून घ्यावेत.

- बाळाला जवळ घेतल्यानंतर तोंडाला मास्क अवश्य असावा.

- खोकला किंवा कफ असल्यास जवळ टिश्यू अवश्य ठेवावा.

- टिश्यू वापरल्यास लगेच तो डिस्पोज करून पुन्हा हात धुवावेत.

बातम्या आणखी आहेत...