आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोषक पेय:उन्हाळ्यात नैसर्गिक ऊर्जा देणारे पेय घ्या आणि उत्साही राहा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उन्हाळ्यात पुरेशा विश्रांतीसोबतच पोषक आहाराची गरज असते.

वर्क फ्रॉम होम असो वा घरातील इतर कामे. या काळात शरीराला भरपूर आराम मिळत असला तरी उन्हाळ्यात पुरेशा विश्रांतीसोबतच पोषक आहाराची गरज असते. सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत आपले शरीर काम करत असते. शरीर देखील थकते. अशा वेळी  गरज भासते ऊर्जा देणाऱ्या पेयांची. सध्या बाजारातील एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकतात म्हणून आरोग्याशी तडजोड न करता नैसर्गिक ऊर्जा देणारी पेय घेणे ‍कधीही चांगले. अशा पेयांबद्दल जाणून घेऊ या.

लिंबू पाणी:  लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते. आणि शरीरास नवी ऊर्जा देते.

शहाळ्याचे पाणी : शहाळे किंवा नारळ हे शरीरामधील झालेली पाण्याची कमतरता  पूर्ण करून शरीरास शक्ती देते. यामध्ये नैसर्गिकरीत्या असलेले पोटॅशियम पाण्याची कमी होऊ देत नाही.

ताक : उन्हाळ्यात ताक पिणे अत्यंत फायदेशीर ठरते.  या दिवसात अन्न पचवण्यासाठी ताकाचे सेवन करावे. यामुळे पोटातील उष्णता कमी होण्यास मदत होते.

ग्रीन टी : हे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते अाणि शरीराला उत्स्फूर्तता म्हणजेच ऊर्जा  मिळते. व्यायामानंतर ग्रीन टी पिणे योग्य ठरेल. 

दूध : लहानपणापासूनच आपल्याला शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दूध हे सगळ्यांसाठी फायदेशीर आहे. दुधात अधिकाधिक पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे हा संपूर्ण आहार मानला गेला आहे. व्यायामानंतर दूध पिणे अधिक फायदेशीर आहे.

वरील सर्व पेये ही ऊर्जा देणारी आहेत. यामुळे शरीराला फायदा होतो आणि थकवा पळतो.

बातम्या आणखी आहेत...