आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा{हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनातून.... उन्हाळा सुरू झाला आहे. या दरम्यान शरीरात पाण्याची कमतरता ही एक सामान्य समस्या आहे, परंतु या सामान्य दिसणाऱ्या समस्येकडे थोडे दुर्लक्ष केले तर लगेचच ती गंभीर स्वरूप धारण करते. खरं तर उन्हाळ्यात शरीराला स्वतःला सामान्य ठेवण्यासाठी जास्त घाम येतो, परिणामी शरीराला पाण्याची जास्त गरज असते. पाण्याची कमतरता शारीरिक हालचालींमुळे किंवा काही आजार वा इतर शारीरिक कारणांमुळेही होऊ शकते. तहान कमी लागत असेल आणि पुरेसे पाणी प्यायले जात नसेल तर काही लक्षणांच्या आधारे शरीर त्याचे संकेत देते. पाण्याच्या कमतरतेमुळे दिसणारे संकेत आणि नुकसान याबाबत जाणून घ्या.
पाण्याच्या कमतरतेचा शरीर आणि मन दोन्हीवर होतो समान परिणाम थकवा : शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे, शारीरिक श्रम केल्यानंतर लवकर थकवा येऊ लागतो. मोटिव्हेशन कमकुवत होते. काम सुरू ठेवणे कठीण होते. कारण : पाण्याच्या कमतरतेमुळे सांध्यांतील लुब्रिकेशन आणि कुशनवर ताण पडतो, त्यामुळे थकवा लवकर जाणवू लागतो. एकाग्रतेचा अभाव : पाण्याच्या कमतरतेमुळे छोट्या-छोट्या गोष्टी विसरणे, एकाग्रतेचा अभाव अशा समस्या निर्माण होतात. यासोबतच वागण्यात चीडही दिसू लागते. कारण : हे न्यूरोट्रान्समीटर व हार्मोन्स निर्मितीसाठीही आवश्यक आहे. मेंदूला स्मरणशक्तीवर प्रक्रिया करण्याची ऊर्जाही पाण्यापासून मिळते. पचनक्रिया : जे लोक कमी पाणी पितात त्यांना बद्धकोष्ठता आणि पचनाच्या तक्रारी जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे भुकेशी संबंधित समस्या वाढतात. पुढे हे शरीरासाठी खूप धोकादायक ठरते. कारण : मोठ्या आतड्यात पाण्याचे रिसेप्टर्स असतात, ते पाणी शोषून घेतात. कमी पाणी प्याल तेव्हा मोठ्या आतड्याच्या कार्यावर परिणाम होतो.
डोकेदुखी : याला डिहायड्रेशन हेडॅक असेही म्हणतात. यात थकवा, तोंड कोरडे पडँे, वाढती तहान व चक्कर येणे यासह डोकेदुखीचा समावेश आहे. उन्हाळ्यात ही एक सामान्य समस्या आहे. कारण : कमी पाणी प्यायल्याने मेंदूच्या ऊती संकुचित होतात. मेंदू ही उणीव कवटीच्या ओलाव्याने भरून काढतो, त्यामुळे मज्जातंतूंवर दबाव येतो.
कोणाला किती पाणी आवश्यक : प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या साधारणपणे असे म्हटले जाते की, तरुणाने किमान ८ ग्लास पाणी प्यावे, परंतु हे बरोबर नाही. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या मते, प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक स्थितीनुसार आणि हालचालींनुसार पाण्याची गरज भिन्न असते. उदा. एसी ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या व्यक्तीची गरज बाहेर उन्हात राहणाऱ्या किंवा इतर शारीरिक हालचाली करणाऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळी असेल. सामान्य माणसासाठी ४ ते ६ ग्लास पाणी पुरेसे असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.