आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Drinking Sugary Drinks Raises Sugar Within 20 Minutes, 38% Higher Risk Of Heart Attack, Dangerous Drinking At Night

द्रवरूप साखर:साखरयुक्त पेय प्यायल्याने 20 मिनिटांतच वाढते साखर, हृदयविकाराचा धोका 38% अधिक, रात्री पिणे धोकादायक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी पाचक प्रणाली द्रव कॅलरीजसाठी बनलेली नाही. सोडा, स्पोर्ट््स ड्रिंक्स, ज्यूस आणि इतर शर्करायुक्त पेये प्यायल्याने भूक भागत नाही. दुसरीकडे, एखाद्या व्यक्तीचे साखरयुक्त पेये पिऊन दीर्घ काळ बसणे होत असेल तर त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीसंबंधी आजारांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. ब्रिटिश फार्मासिस्ट नीरज नाईक यांनी केलेल्या संशोधनात आढळले की, कोकच्या ३५० मिली कॅनमध्ये सुमारे ३७ ग्रॅम सांद्रित साखर किंवा सुमारे १० चमचे साखर असते. एवढेच नाही, तर कोकचा फक्त एक डबा प्यायल्याने माणसाची साखरेची पातळी २० मिनिटांत वाढते. कोकसारख्या सर्व शीतपेयांमध्ये आढळणारे कॅफिन ४० मिनिटांत शरीरात शोषले जाते. हे हार्मोन डोपामाइन वाढवते, त्यामुळे ते अधिक प्यावेसे वाटते. शीतपेयेसुद्धा माणसाला नशेप्रमाणे व्यसनाधीन करतात, असे चाचणीत आढळले आहे.

आपल्याला माहिती हवे असे द्रवरूप साखरेबद्दल सर्व काही
लिक्विड शुगर म्हणजे काय?

पेयस्वरूपात मिळणारे जवळजवळ सर्व गोड पदार्थ असतात लिक्विड शुगर
सोडा, कोल्ड्रिंक्स, चहापासून ते साखरेपासून तयार केलेले जवळपास सर्व प्रकारचे शेक, फ्रूट पंच इ. सर्व द्रवरूप साखर आहे. साखरेशिवाय फळांचे रसदेखील द्रवरूप साखर असतात. यामध्ये साखर सांद्रित स्वरूपात असते, त्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.

साखरेचा आरोग्यावरील परिणाम?
लठ्ठपणा, मधुमेहाचा सर्वाधिक धोका

लिक्विड शुगर वजन-नियमन करणाऱ्या लेप्टिन हार्मोनवर परिणाम करते, त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कालांतराने जास्त कॅलरी खाल्ल्यासारखे वाटणे थांबते. यामुळे लठ्ठपणा वाढतो. संशोधनानुसार, जास्त साखर खाणाऱ्या व्यक्तीमध्ये हृदयविकाराचा धोका ३८% जास्त असतो.

साखरेच्या पेयात साखर किती?
३५० मिलीच्या कॅनमध्ये १०-१३ चमचे साखर

ब्रिटिश संशोधनानुसार, सॉफ्ट ड्रिंकच्या सामान्य आकाराच्या कॅनमध्ये सुमारे १० ते १३ चमचे साखर असते. या साखरेपासून शरीरात वाढलेल्या उष्मांकामुळे ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोम (ओएसएच) होण्याचा धोका वाढतो. यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये लठ्ठपणाचा धोका झपाट्याने वाढतो.

रात्री किती नुकसानदायक? त्यात कॅफिन असल्याने झोपेचे विकार वाढतात
स्लीप फाउंडेशनच्या मते, ९६% शीतपेयांत कॅफिनचे प्रमाण जास्त असते. कॅफिनमुळे सतर्कता वाढते. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी कोक, सोडा इ. शीतपेये प्यायल्याने निद्रानाशाची तक्रार वाढते. त्याच वेळी, रात्रीच्या वेळी इतर शर्करायुक्त पेये प्यायल्याने मर्यादित शारीरिक हालचालींमुळे साखरेचा धोका वाढतो.-डॉ. काजल पांड्या येप्थो, मुख्य आहारतज्ज्ञ, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल, नवी दिल्ली

बातम्या आणखी आहेत...