आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

संशोधन:रेस्तरॉंमध्ये जेवल्याने वाढतो कोरोना संसर्ग, अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचा दावा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 41 टक्के लोकांनी संसर्गापूर्वी रेस्तरॉंमध्ये जेवण केले हाेते

रेस्तरॉंमध्ये जेवताना, पाणी पिताना मास्क लावणे आणि शारीरिक अंतर राखणे अवघड जाते. ४१ टक्के लोक पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आले होते. संक्रमित होण्याच्या १४ दिवसांच्या आतच हे सर्व जेवण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेले होते किंवा कॉफी शॉपमध्ये गेल्याचे समोर आले.

जे लोक खाण्या-पिण्यासाठी रेस्तरॉं, पब किंवा कॉफी शॉपमध्ये जातात त्यांच्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग घरात राहिलेल्या लोकांपेक्षा दुप्पट होता, असे अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (सीडीसी) नुकत्याच प्रकाशित केलेल्या संशोधनात म्हटले आहे.

हा अहवाल सीडीसीने ११ सप्टेंबरला मोर्बेडिटी अँड मॉर्टेलिटी (रुग्णांची संख्या आणि मृत्युदर) या नावाने प्रकाशित केला. भारतासाठी हा अहवाल खूपच महत्त्वाचा आहे, कारण आपल्याकडे सर्वच ठिकाणी खाण्यापिण्याचे रेस्टॉरंट उघडले गेले आहेत. शिवाय लग्न समारंभासारख्या कार्यक्रमांसाठीही बरीच सवलत मिळाली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्याला जास्त काळजी घेण्याची गरज आहे.