आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य:मलावरोध (कॉन्स्टिपेशन) आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्ची केळी खाणे फायदेशीर

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कच्ची केळी खाणे हे शरीरासाठी चांगले असते

कच्ची केळी खाणे हे शरीरासाठी चांगले असते. यामध्ये भरपूर व्हिटॉमिन, कॅल्शियम असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने कच्ची केळी खाणे फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया कच्च्या केळीचे फायदे

> भरपूर पोटॅशियम असल्याने कच्ची केळी आपल्याला पुरेसे व्हिटॅमिन आणि अँटिऑक्सिडंट देतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. दिवसभर आपल्याला उत्साही आणि तरतरीत ठेवण्यास मदत करते.

> मलावरोधाचा त्रास असल्यास कच्ची केळी उपयुक्त आहेे. त्यात असलेले फायबर आणि स्टार्च आतड्यांमध्ये संक्रमण रोखण्यास मदत करते ज्याने पोटाच्या समस्यांपासून आराम होतो.

> यामुळे पचनक्रियादेखील चांगली राहते. याचे सेवन केल्याने पाचक रसांचा स्राव चांगल्या प्रकारे होतो आणि पचन चांगले होते.

> कच्च्या केळीमध्ये असलेले कॅल्शियम हाडेे मजबूत करण्यात मदत करते आणि गुडघ्यासंबंधी समस्या उद‌्भवत नाहीत.

> मधुमेहावरही कच्ची केळी खाणे फायदेशीर आहे. यामुळे भूकेवरही नियंत्रण ठेवता येते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser