आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने पाण्याचे संतुलन राहते कायम, होतात इतरही खास फायदे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उन्हात बाहेर पडताच थकवा आणि ऊर्जेची कमतरता वाटू लागते. उन्हाळ्यात घामासोबत शरीरातील ऊर्जासुद्धा बाहेर जाते.

उन्हात बाहेर पडताच थकवा आणि ऊर्जेची कमतरता वाटू लागते. उन्हाळ्यात घामासोबत शरीरातील ऊर्जासुद्धा बाहेर जाते. अशा हवामानात शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास आजारांना आमंत्रण मिळते. शरीराला साखर आणि पाण्याचे संतुलन मिळवून देणाऱ्या फळांना उन्हाळ्यात विशेष मागणी असते. उन्हाच्या काहिलीपासून गारवा देणाऱ्या हंगामी फळांची आवक वाढली आहे. उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन कायम राहू शकते. तर जाणून घ्या, टरबुजाचे खास फायदे आणि उपाय-

> टरबुजामध्ये ९० टक्के पाणी असते. हे खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता येत नाही. यात व्हिटॅमिन्स ‘ए’ आणि ‘सी’ असतात. फ्रूट सॅलडमध्येदेखील कलिंगड वापरता येते.

> टरबूज रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. जे लोक सतत कामाच्या तणावात राहतात त्यांच्यासाठी टरबूज गुणकारी आहे. त्यामुळे डोके शांत आणि मन प्रसन्न राहते.

> टरबुजाचे नियमित सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर असते. यात बिटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते.

> टरबूज वजन कमी करण्यासाठी सर्वात उत्तम फळ आहे. यामध्ये असलेले सिट्र्यूलाइन नावाचे तत्त्व शरीरातील वसा कमी करण्यास मदत करते. हे तत्त्व वसा तयार करणाऱ्या पेशींना कमी करते. टरबुजामध्ये असलेले पाण्याचे जास्त प्रमाण डाएटिंग दरम्यान एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या व्यतिरिक्त टरबुजामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात.

> टरबुजामध्ये भरपूर प्रमाणात असलेली पोटॅशियमची मात्रा नर्व्हस सिस्टीम आणि स्नायू स्वस्थ ठेवण्यात सहायक ठरते. याच्या सेवनाने स्नायूशी संबंधित समस्येपासून दूर राहणे शक्य आहे. टरबूज आणि टरबुजाचा रस स्नायूच्या वेदना कमी करण्यास मदत करते.

> यात पाणी आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे अपचन, गॅस अशा समस्या होत नाहीत. पचनतंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी टरबूज उपयोगी फळ आहे.

> टरबुजामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करते. यामुळे ताप व संक्रमण (इन्फेक्शन)पासून दूर राहू शकतो.

बातम्या आणखी आहेत...