आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासकाळी झोपेतून उठल्यावर नाष्ट्याआधी ब्रश करावा की नंतर. या प्रश्नावर दंतचिकित्सकांची वेगवेगळी मते आहेत. कुणी आधी ब्रश करण्याचा सल्ला देतो तर कुणी नाष्ट्याआधी.
नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीतील डेंटिस्ट डॉ. अपोइना रिबेइरो सांगतात की, सकाळी तोंडात सर्वात जास्त जीवाणू असतात आणि त्यांना कार्बोहायड्रेट आवडते. बहुतांश लोक नाष्ट्यात ब्रेड,पॅनकेक आदी खातात. यात मोठ्या प्रमाणात कार्बाेहायड्रेट असते. अशात ब्रशशिवाय नाष्टा केल्यास जीवाणूंना मेजवानी मिळू शकते. जीवाणू वेगाने आपली संख्या वाढवतात आणि तोंडात अॅसिड सोडतात. हे दातांच्या सुरक्षेसाठीच्या इनेमलचे नुकसान पोहोचवतात. आधी ब्रश केल्याने जीवाणू साफ होतात. आधी ब्रश केल्याने तोंडात लाळेची निर्मिती सुरू होते जी दाताच्या सुरक्षा करते. लाळ तोंडात मिनरल्स गोळा करते. यात बायकार्बाेनेटही असते, जे तोंडाची अॅसिडीटी कमी करते. यासोबत पेस्टमध्ये दिसणारे फ्लोराइड दातांच्या इनेमलला बळकट करते.
चहा-कॉफी प्यायल्यानंतर ब्रश नको, ३० मिनिटे थांबा मिशिगन स्कूल ऑफ डेंटिस्ट्रीमध्ये प्रा.डॉ. कार्लाेस गोन्झाल्विस म्हणाले, अनेक व्यवस्थित ब्रश करत नाहीत. काही जीवाणू तोंडातच राहतात. हे जीवाणू दातांना नुकसान पोहोचवतात. नाष्ट्यानंतर ब्रश केल्यास त्यापासून बचाव होऊ शकतो. डेंटिस्ट्री प्रा. डॉ. रोकिओ क्यूंओनेज म्हणाले, दिनचर्येच्या हिशेबाने ब्रश करा. मात्र, तज्ज्ञ सांगतात की, नाष्ट्यात चहा-कॉफी घेतल्यानंतर त्वरित ब्रश केला नाही पाहिजे. नाष्टा आणि ब्रश यांच्यात अर्ध्या तासाचे अंतर ठेवले पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.