आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभावी उपाय:संतुलित वजन, योग्य प्रकारे झोपणे आणि जिभेचे व्यायाम घोरणे कमी करण्यासाठी प्रभावी उपाय

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जिभेचे व्यायाम करा
जिभेला स्नायूंच्या व्यायामाद्वारे बळकट केल्यास घोरण्याची समस्या कमी करता येते यासाठी जिभेला आपल्या टाळूच्या दिशेने गोल करून फिरवण्याचा व्यायाम करता येईल.

वजन कमी करा
वाढलेल्या वजनाचा घोरण्याशी थेट संबंध आहे. अधिक वजनाने श्वासनलिकेवरील दबाव वाढतो. वजन संतुलित असल्यास श्वास घेतल्यावर श्वासनलिकेवरील दबाव कमी होतो. प्राणवायू सहज पुढे जातो.

एका कुशीवर झोपा
घोरण्याची समस्या असलेल्या लोकांवर केलेल्या एका इस्रायली संशोधनात आढळले की, एका कुशीवर झोपल्याने ५० टक्के लोकांचे घोरणे बंद झाले.

माऊथ गार्ड
माऊथ गार्ड जबडा थोडा पुढे ठेवतो. यामुळे जीभ गळ्याकडे सरकवून तो चोक करू शकत नाही. पण, माऊथ गार्ड जबड्यात योग्य प्रकारे बसला तरच असे शक्य होते.