आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावरान व पोल्ट्रीच्या अंड्यात सारखेच पोषण:शारीरिक हालचालीशिवाय 2 पेक्षा जास्त अंडे खाणे धोकादायक

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात रस्त्याच्या कडेला अंड्यांची दुकाने सजलेली दिसतात. दोन प्रकारचे अंडे मिळतात, एक ब्राऊन आणि दुसरे व्हाईट. ज्याला आपण गावरान आणि पोल्ट्रीचे अंडे म्हणतो. आजच्या स्टोरीत आम्ही सांगू की, कोणते अंडे आपण खायला हवे. गावरान की पोल्ट्रीचे. दुसरे हेही जाणून घेऊ की दररोज किती अंडी खावी?

मेडिका रुग्णालयातील न्युट्रिशनिस्ट डॉ. विजयश्री प्रसाद सांगतात की, पोल्ट्रीच्या अंड्यांच्या तुलनेत गावरान अंडे कमी मिळतात. गावरान अंडे ब्राऊन म्हणजेच तपकिरी रंगाचे असतात, तर पोल्ट्रीचे अंडे पांढऱ्या रंगाचे असतात. मात्र पोषणाच्या दृष्टीने दोन्ही अंड्यांत फारसा फरक नसतो. दोन्हींमध्ये सारखेच पोषक घटक असतात. आकाराने लहान किंवा मोठ्या अंड्यांविषयी बघितल्यास थोडा फरक दिसतो. मोठ्या आकाराचे एक अंडे खाल्ल्यास 90 कॅलरी आणि 8 ग्रॅम प्रोटिन मिळते. तर मध्यम आकाराच्या अंड्यातून 60 कॅलरी आणि 6 ग्रॅम प्रोटिन मिळते.

दुसरी गोष्ट ही की, कोणत्या अंड्यांत प्रोटिन, व्हिटामिन, फॉलिक अॅसिड, कॅल्शियम किंवा दुसरे पोषक घटक किती असतील हे यावर अवलंबून असते की कोंबड्यांना काय खाऊ घातले जाते. जसे - अनेक पोल्ट्री फार्मवाले कोंबड्यांना ओमेगा-3 फॅटी अॅसिडस, व्हिटामिन आणि दुसरे पोषक घटक असलेले दाणे खाऊ घालतात. तर गावरान कोंबड्या पाळणारे शेतकरीही पोषक आहार देतात. मात्र अनेकदा पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांना कृत्रिम हार्मोन्स आणि औषधे दिली जातात. याचा अंड्यांवर परिणाम होतो. म्हणूनच असे मानले जाते की पोल्ट्रीच्या अंड्यांऐवजी गावरान अंडी जास्त चांगली आहेत.

गावरान अंड्यांत जास्त व्हिटामिन डी

अलिकडील एका संशोधनात सांगितले आहे की गावरान कोंबड्या खुल्या वातावरणात फिरतात. त्यामुळे त्यांच्या अंड्यांत व्हिटामिन डीचे प्रमाण जास्त असते. पोल्ट्रीतील कोंबड्या कैद असतात. तिथे त्यांना योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळत नाही. म्हणून व्हिटामिन डीसाठी गावरान अंडे खाल्ले जाऊ शकतात.

अंड्यांविषयी मिथके काय आहेत?

मिथकः सडलेल्या अंड्यातून नेहमी दुर्गंधी येते

वास्तवः योग्य तापमानात ठेवले नाही तर अंडे खराब होऊ शकतात. अंड्यांच्या बारीक छिद्रातून बॅक्टेरिया आता जाऊ शकतात. अशात अंडी खराब होतात. मात्र त्यांचा वास येत नाही.

मिथकः बाहेरून घाण दिसणारे अंडे पाण्याने धुवायला हवे

वास्तवः सामान्य किंवा कोणतेही अंडे धुतले नाही पाहिजे. धुतल्याने अंड्यांला बारीक छिद्र होऊन हानिकारक बॅक्टेरिया आत जाऊ शकतात.

मिथकः अंड्यांच्या कवचावर घाण लागलेली असते, त्याने कळते की अंडे सेंद्रिय आणि नैसर्गिक आहे

वास्तवः कोंबड्यांच्या घरट्यातून अंड्याला घाण लागलेली असते. यामुळे बॅक्टेरिया पसरतात. या दृष्टीने ते सेंद्रिय मानले जाऊ शकत नाही.

मिथकः अंडे सामान्य तापमानात फ्रेश ठेवता येतात

वास्तवः अंडे फ्रेश ठेवण्यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवले पाहिजे.

मिथकः कच्चे अंडे खाल्ल्याने जास्त फायदा होतो

वास्तवः अंडे कधीही कच्चे खायला नको. यामुळे सॅल्मोनेला इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. आजारी व्यक्तीने विशेषतः कच्चे अंडे खाल्ले नाही पाहिजे.

अंड्यातून काय-काय मिळते?

एका अंड्यात प्रोटिन, नायसीन, रायबोफ्लेविन, क्लोरिन, सोडियम, पोटॅशियम, झिंक आणि सल्फर असते. अंड्यात व्हिटॅमिन एड, डी आणि ई असते. यात व्हिटामिन बी12, फॉलिक अॅसिड, कोलिन, ल्युटिन, आयर्न, कॅल्शियम, कॉपर आणि फॉस्फरस पुरेशा प्रमाणात असते.

एका दिवसात किती अंडी खावी?

डॉ. विजयश्री प्रसाद सांगतात की कुणीही व्यक्तीने एका दिवसात किती अंडी खावी हे त्याच्या शारीरिक हालचालींवर अवलंबून असते. जसे एखादा अॅथलिट सामान्य व्यक्तीच्या तुलनेत आपल्या आहारात जास्त अंडी घेऊ शकतो. तथापि सामान्य व्यक्ती दिवसातून एक ते दोन अंडी खाऊ शकतो. एकदाच चार-पाच अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते जे ह्रदयासाठी नुकसानकारक आहे.

डिस्क्लेमर- या लेखात दिलेल्या सूचना तज्ज्ञांनुसार लिहिलेल्या आहेत. वापरापूर्वी तज्ज्ञांशी सल्लामसलत करून घ्या.

बातम्या आणखी आहेत...