आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रो ब्रेक्स:दीर्घकाळ सलग कामात 10 मिनिटांच्या विश्रांतीनेही वाढते ऊर्जा

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामाच्या दरम्यान स्वत:ला फ्रेश आणि ऊर्जावान ठेवायचे असेल तर मध्ये मध्ये १० मिनिटांची विश्रांती घ्या. पीएलओएस वन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात आढळले की, जे लोक कामाच्या दरम्यान विश्रांती घेतात ते अधिक उत्साही असतात. त्यांचा थकवाही कमी असतो. टोरंटो विद्यापीठातील ऑर्गनायझेशनल बिहेवियर आणि ब्रेक एक्सपर्टचे प्रोफेसर जॉन पी. ट्राउगाकोस यांच्या मते, बैठे काम करणाऱ्या लोकांनी कामाच्या दरम्यान थोडासा ब्रेक घेतला तर त्याचा त्यांच्या कामावर खूप सकारात्मक परिणाम होतो.

मायक्रो ब्रेक्स का गरजेचे : थकवा कमी होतो २०-३० मिनिटांनी डोळ्यांना आराम देणे आणि स्ट्रेच केल्याने डोळ्यांवरील ताण कमी होतो, शरीराचा थकवा कमी होतो. प्राॅडक्टिव्हिटी ट्रॅकर कंपनीच्या संशोधनानुसार, ५२ मिनिटांच्या कामानंतर १७ मिनिटांचा ब्रेक आवश्यक आहे.

ब्रेक घेण्याची आदर्श वेळ : ९० मिनिटांत १५-२० मि. तुम्ही कोणते काम करत आहात यावरही ब्रेक अवलंबून असतात. उदा. नावडत्या किंवा तणावपूर्ण कामाच्या तुलनेत काम आनंददायी असेल तर थकवा कमी जाणवतो. ट्राॅगाकोसच्या मते, सुमारे ९० मिनिटांच्या कामानंतर १५ ते २० मिनिटांचा ब्रेक घेणे आवश्यक आहे. तथापि, या वेळी २० ते ३० मिनिटांदरम्यान लाइट स्ट्रेचिंगसारखा ब्रेकदेखील आवश्यक आहे, तर ९० मिनिटांनंतर काम १५ ते २० मिनिटे थांबवावे.

बातम्या आणखी आहेत...