आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 मे, वर्ल्ड नो टोबॅको डे:केवळ सिगारेटदेखील तुमच्या हृदयावर कमीत कमी 20 मिनिटे परिणाम करते

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगभरात दर 4 सेकंदाला एका व्यक्तीचा तंबाखूमुळे मृत्यू होतो

तंबाखू सेवन किंवा पॅसिव्ह स्मोकिंगच्या परिणामामुळे अकाली मृत्यूच्या दाढेत लोटले जातात. यामुळे कॅन्सर, हृदयरोग, स्ट्रोक, फुप्फुसांचे विकार, मधुमेह, क्रोनिक पल्मोनरी डिसिज असे गंभीर आजार होतात, तसेच सध्या जगभर पसरलेल्या कोविड-१९ सारख्या महामारीमुळे गंभीर संसर्ग होऊन मृत्यूचा धोका अधिकच वाढतो. जानेवारी २०२१ मध्ये ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, धूम्रपान करणाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्याची गरज इतर रुग्णांपेक्षा दुप्पट असते.

तंबाखू सोडल्यास असा होईल शरीराला फायदा

  • २० मिनिटांनी वाढलेली हृदयाची गती, बीपी सामान्य होणे सुरू होते.
  • १२ तासांत रक्तातील कार्बन मोनोऑक्साइडचा स्तर कमी होतो.
  • ४८ तासांत तोंडाची चव, गंधाच्या क्षमतेत सुधारणा होणे सुरू होते.
  • २ आठवडे ते ३ महिन्यांत हृदय विकाराचा धोका कमी होतो, रक्ताभिसरण सुधारते, फुप्फुसांची कार्यप्रणाली चांगली काम करते.
  • १ ते ९ महिन्यांत धाप लागणे कमी होते. श्वास फुलून येत नाही.
  • १ वर्षातच हृदयातील धमन्यांबाबतचा धोका निम्म्यावर येतो.

डॉ. रवी दोसी
चेस्ट फिजिशियन, प्रोफेसर अँड एचओडी, डिपार्टमेंट ऑफ रेस्पिरेटरी डिसिज, डीटीसीडी-डीएनबी

बातम्या आणखी आहेत...