आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदी राहण्यासाठी:किमान 10 मिनिटे व्यायाम करा, दीर्घ श्वसन करा, चवीने खा... आनंद होईल

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आनंदी राहण्यासाठी काही विशेष अटी असाव्यात, तरच आपण आनंदी राहू शकतो, असे तुम्हालाही वाटते का? पण तसे नाही. काही सवयी अंगीकारल्या तर आपण नेहमी आनंदी राहू शकतो. वेबएमडीने याची वैज्ञानिक पद्धत सांगितली आहे.

हा आहे आनंदाचा वैज्ञानिक फॉर्म्युला १. हळू आणि खोल श्वास घ्या : अमेरिकन नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, हळू आणि खोल श्वास घेतल्याने तणाव कमी होतो. - डोळे बंद करा. चांगल्या स्मृती किंवा ठिकाणाची कल्पना करा. नाकाने हळूहळू दीर्घ श्वास घ्या. तोंडाने किंवा नाकाने हळूहळू श्वास सोडा. हे पुन्हा पुन्हा करा. हळू श्वास घेण्यास त्रास होत असेल तर श्वास घेताना व सोडताना मनात पाच अंक मोजा.

२. १० मिनिटे व्यायाम/खेळ : १० मिनिटांचा व्यायामही तणाव आणि चिंता कमी करू शकतो. आत्मविश्वास वाढतो. -रात्रीच्या जेवणानंतर रोज फिरायला जा. दिवसाची सुरुवात ५ मिनिटे स्ट्रेचिंगने करा. नाचणे, क्रिकेट खेळणे, बॅडमिंटन इ. सारखे कोणतेही आवडते उपक्रम सुरू करा.

३. चवीने अन्न खा ः अन्न विविध प्रकारचे हार्मोन्स सोडते, त्यामुळे मूडदेखील सुधारतो. -एकदल धान्य आणि भाज्यांमध्ये जटिल कर्बोदके असतात. ते सेरोटोनिन हा फीलगुड हार्मोन सोडतात. उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ नॉरपेनेफ्रिन सोडतातस त्यामुळे ऊर्जा आणि एकाग्रता वाढते.

बातम्या आणखी आहेत...