आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Exercise Is More Beneficial Than Bone And Joint Surgery, Physiotherapy And Medicine Are Effective | Marathi News

आरोग्य:हाडे, सांध्यांच्या शस्त्रक्रियेपेक्षा व्यायाम अधिक फायदेशीर, फिजिओथेरपी आणि औषधे प्रभावी

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल गुडघे व हिप रिप्लेसमेंटसह हाडांच्या अनेक समस्यांसाठी शस्त्रक्रिया करणे सामान्य झाले आहे. यापैकी अनेक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा पुरावा चाचणीत सापडला नाही, असे एका पुनरावलोकनात आढळून आले आहे. शस्त्रक्रिया प्रभावी असल्याचे दिसले तरीही ते शस्त्रक्रियेशिवाय उपचारापेक्षा खूप चांगले नसल्याचे पुनरावलोकनात आढळले. अनेक प्रकरणांमध्ये व्यायाम, फिजिओथेरपी आणि औषधोपचार यांसारख्या पर्यायांपेक्षा शस्त्रक्रिया अधिक प्रभावी ठरली नाही.

ब्रिटिश संशोधकांनी गुडघा, नितंब, खांदा, पाठीचा कणा आणि मनगटाच्या दहा सामान्य ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियांचा अभ्यास केला. इतर शस्त्रक्रियांपेक्षा गुडघा बदलण्यासह इतर उपचार अधिक फायदेशीर असल्याचे त्यांना आढळून आले. इतर सहा प्रकारच्या सामान्य शस्त्रक्रियांच्या अध्ययनात आढळून आले की, व्यायाम, वजन नियंत्रण, फिजिओथेरपी व औषधांसह उपचार अधिक प्रभावी आहेत. या शस्त्रक्रियांमुळे रुग्ण बरे होतात, असे आमच्या अध्ययनात दिसले नाही, असे इंग्लंडच्या ब्रिस्टल विद्यापीठाचे ऑर्थोपेडिक सर्जरीचे प्रा. डॉ. अॅश्ले ब्लॉम म्हणतात.

सॅन फ्रान्सिस्कोच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील ऑर्थोपेडिक सर्जरीचे प्रोफेसर डॉ. सॅम मोर्शेड म्हणतात, काही शस्त्रक्रियांची परिणामकारकता तपासली पाहिजे. याबरोबरच उपचारांना न्याय देणाऱ्या चाचणीचा अर्थ उपचार प्रभावी नाही, असा नाही. हिप सर्जरी हे एक उत्तम उदाहरण आहे, असे ते म्हणतात. हिप सर्जरीवर चाचण्या झाल्या नाहीत, परंतु गैर-शस्त्रक्रिया उपचारांच्या तुलनेत त्या प्रभावी असल्याचा पुरावा आहे.

शस्त्रक्रिया व इतर उपायांतून दिलासा जवळपास सारखाच
गुडघ्याच्या आतील अस्थिबंधन किंवा एसीएलवर उपचार करण्यासाठी आॅर्थोस्कोपिक शस्त्रक्रिया अमेरिकेत खूप सामान्य आहे. खेळाडूंना या प्रकारच्या दुखापतीचा धोका जास्त असतो. काही अध्ययनांत त्यांच्या यशाचा दर ९७ टक्के असल्याचे आढळून आले आहे. परंतु, शस्त्रक्रियांची तुलना नॉन-सर्जिकल उपचारांशी केली असता, दोन उपचारांतील वेदनांत थोडा फरक होता. खांद्याच्या सांध्याशी जोडलेल्या स्नायूंवर रोटेटर कफ ऑपरेशन्सच्या पुनरावलोकनात संशोधकांना आढळले की, व्यायाम, स्टिरॉइड इंजेक्शन्ससह उपचार व शस्त्रक्रियेतून वेदना, खांद्याची हालचाल वा रुग्णाला आरामाच्या बाबतीत काही फरक नाही. मणक्याच्या खालच्या भागात असलेल्या डिस्क समस्यांवरील ऑपरेशन्सच्या तीन विश्लेषणांत शस्त्रक्रिया व गैर-शस्त्रक्रिया उपचारात समान सुधारणा दिसली.

बातम्या आणखी आहेत...