आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:आठवड्यातून 4 दिवस रोज 8 तास स्क्रीनवर काम करणे म्हणजे 20 मिनिटे रणरणत्या उन्हात घालवणे

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तणाव : आपण चिंताग्रस्त होतो तेव्हा तयार होतात हानिकारक हार्मोन्स
२०१७ मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, आपण तणावाखाली असतो तेव्हा शरीर अधिक कार्टिसोल हार्मोन बनवते. त्याच वेळी मेंदूचा एक भाग हायपोथालेमस सीआरएच नावाचे हार्मोन बनवतो. सीआरएच केसांच्या रोमांजवळ आढळणाऱ्या सिबॅशियस ग्रंथींमधून बाहेर पडणाऱ्या तेलाचे प्रमाण वाढवते, त्यामुळे छिद्रे बंद होतात.

उच्च धगीतील अन्न : हे टाळावे
पबमेड.जीओव्हीच्या म्हणण्यानुसार, ओमेगा सिक्स फॅटी अॅसिडसह स्वयंपाकाचे तेल उदा. सूर्यफूल आणि कॉर्न ऑइल जास्त उष्णतेवर फ्री रॅडिकल्स सोडतात. ते त्वचेच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते.

स्क्रीन टाइम : गॅजेट्सचा ब्लू लाइट... सूर्याच्या यूव्ही लाइटपेक्षा जास्त धोकादायक
हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार मोबाइल, संगणक, टीव्ही इ. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा निळा प्रकाश सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपेक्षा त्वचेच्या थरांमध्ये खोलवर जातो. आठवड्यातून ४ दिवस संगणकावर ८ तासांच्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर त्याचा परिणाम दुपारच्या उन्हात २० मिनिटे घालवल्यासारखाच होतो. त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो.

बातम्या आणखी आहेत...