आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्किन केअर:स्किन प्रोब्लेमचे कारण बनू शकतो फेस मास्क, अशा परिस्थितीत जाणून घ्या हे वापरण्याची योग्य आणि सुरक्षित पद्धत 

Aurangabadएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • समस्या निर्माण करू शकतो एन95 मास्क...

देशात कोरोना लॉकडाउनमुळे जर एखाद्या गरजेच्या कामासाठी बाहेर पडावे लागत असेल, तर लोकांना फेस मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. सरकारच्या नव्या गाइडलाइनमध्येही पब्लिक प्लेसवर मास्क घालण्याचे कडक निर्देश दिले गेले आहेत. पण खूप काळ फेस मास्क लावल्यामुळे स्किनशी निगडित समस्या उद्भवू शकतात. फेस मास्क लावल्याने चेहऱ्यावर सतत घाम येतो, खाज येते आणि चेहऱ्यावर लाल निशाण उमटतात.  

मास्कमुळे बॅक्टेरीयल इंफेक्शन होण्याची भीती.... 

ज्यांच्या चाऱ्यावर जास्त घाम येतो, जर त्यांनी मास्क लावून तेहवला तर त्यांना आणखी घाम येतो. यामुळे त्या व्यक्तीला बॅक्टेरियल इंफेक्शन होण्याची भीत असते. सोबतच मास्कच्या कापडामुळे काही लोकांना खाज, रॅशेस, पुरळ, डर्मेटायटिस आणि रुक्षपणा यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. 

समस्या निर्माण करू शकतो एन95 मास्क... 

पॉलिप्रोपिलीनने बनलेल्या एन95 मास्कनेदेखील स्किनला त्रास होऊ शकतो. हे एक असे फॅब्रिक आहे, जे मशीनने बनवले जाते. एन95 मास्कमध्ये 4 लेअर असतात, ज्याची सर्वात आतील लेअर सरळ चेहऱ्याच्या संपर्कात येते. ही लेअर पॉलिप्रोपिलीनची बनलेली असते. मात्र पॉलिप्रोपिलीनला त्वचेसाठी सुरक्षित मानले जाते, पण अनेक प्रकरणांमध्ये हा समस्या निर्माण करू शकतो. 

असा करावा मास्कचा सुरक्षित वापर... 

मास्कपासून होणाऱ्या समस्यांपासून वाचण्यासाठी आधी चाऱ्यावर चांगल्याप्रकारे मॉइस्चरायझर लावलेले. हे लावल्याने त्वचेचा ओलावा लॉक होतो. असे केल्याने पुरळ, डागांची समस्यादेखील कमी होते. बॅक्टेरियल इंफेक्शनपासून वाचण्यासाठी 6-8 तासांमध्ये आपला मास्क बदलत राहावे आणि घाम साफ करत राहावे. 

बातम्या आणखी आहेत...