आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Fatty Liver And Eye Risk, Weight And Cholesterol In 50% Of Diabetic Patients Should Be Kept Under Control, Liver, Heart And Kidney Damage

मधुमेहासंबंधीची दक्षता:मधुमेहाच्या 50% रुग्णांना फॅटी लिव्हर व डोळ्यांसंबंधी धोका, वजन आणि कोलेस्टेरॉल ठेवावे नियंत्रणामध्ये, यकृत, हृदय आणि मूत्रपिंडांचे नुकसान

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधुमेह जवळजवळ संपूर्ण शरीराला हानी पोहोचवतो, परंतु यामुळे हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि यकृत यांना जलद व गंभीर नुकसान होते. यकृताकडे लक्ष न दिल्याने नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. टाइप २ मधुमेह असलेल्या सुमारे ५०% लोकांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असते. त्याच वेळी, २४ ते ७० वयोगटातील लोकांमध्ये दृष्टी कमी होण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. एका आकडेवारीनुसार, भारतात यकृत निकामी होण्याचे किंवा यकृत प्रत्यारोपणाचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे मधुमेह. जाणून घेऊया मधुमेहामुळे शरीरातील प्रमुख अवयवांचे कसे नुकसान होते आणि हे नुकसान टाळण्यासाठी पीडितांनी काय केले पाहिजे.

८०% पर्यंत जास्त वजन असलेल्या लोकांना टाइप-२ मधुमेहाचा धोका जास्त असतो.

१५० मिनिटे मध्यम व्यायाम आठवड्यातून केल्याने मधुमेहाचा धोका ६०% घटतो.

मधुमेहाचा या अवयवांवर सर्वाधिक परिणाम होतो
हृदय - मधुमेहींनी ७० च्या खालीच ठेवावे वाईट कोलेस्टेरॉल
मधुमेहींमध्ये ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण खूप जास्त असते. वाईट कोलेस्टेरॉल - एलडीएल अधिक होते व चांगले कोलेस्टेरॉल कमी होऊ लागते. जास्त साखरेमुळे एलडीएलमध्ये बदल होऊन ते रक्तवाहिन्यांपर्यंत जाते व जळजळ होते. नलिकांत प्लेक तयार होतो. त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो.

काय करावे : साखर, रक्तदाब, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवा. वारशाने हृदयविकार असल्यास त्यांची चाचणी घ्या. एलडीएल ७० पेक्षा कमी असावे.

किडनी - पालेभाज्या आणि लसूण वाढवतात गाळण क्षमता
वाढलेल्या साखरेमुळे किडनीचे फिल्टर युनिट नेफ्रॉनचे गंभीर नुकसान होते. रक्त गाळून शुद्ध करण्यात अडचण येते. मायक्रोअल्ब्युमिन प्रथिने मूत्रातून उत्सर्जित होतात. कचरा व अतिरिक्त पाणी शरीरातून बाहेर पडू शकत नाही. रक्तात टॉक्सिन्स वाढू लागतात. किडनी काम करणे थांबवते.

काय करावे : साखर असेल तर दरवर्षी लघवीतील मायक्रोअल्ब्युमिन व किडनीची क्षमता तपासावी. पालेभाज्या, सफरचंद, लसूण खावे.

डोळे - धूम्रपानाच्या रसायनाचा रेटिनावर परिणाम, ते टाळा
डोळा हा कॅमेरा आहे. त्यांचा पुढचा भाग म्हणजे लेन्स व मागचा भाग रेटिनाची फिल्म आहे. दीर्घकाळ साखरेचे प्रमाण जास्त राहिल्यास रेटिनाच्या बारीक रक्तवाहिन्या सुजतात. त्यातील द्रव डोळ्याच्या पडद्यावर गळतो, कमकुवत नळ्यांमधून रक्त बाहेर येऊ शकते. त्याचा रेटिनावर परिणाम होतो, त्यामुळे दृष्टी अंधुक होते.

काय करावे : वर्षातून एकदा रेटिना तपासा. धूम्रपान थांबवा. धुरातून निघणारी रसायने जळजळ वाढवतात. डोळ्यांतील रक्तप्रवाह कमी होतो.

यकृत - अल्ट्रासाऊंड वा फायब्रोस्कॅन करा, वजन नियंत्रणात ठेवा
मधुमेहामध्ये इन्सुलिन संप्रेरक क्रियाशील नसल्यामुळे यकृतात चरबी जमा होऊ लागते. रुग्णाला साखर, गूळ आणि भरपूर आहार घेता येत नसल्याने तसेच व्यायामाचा अभाव असल्यास यकृतामध्ये चरबीचा साठा आणखी वाढतो. ही चरबी यकृताच्या पेशींना हानी पोहोचवते, त्यामुळे यकृताच्या गंभीर समस्या उद्भवतात.

काय करावे : अल्ट्रासाऊंड किंवा फायब्रोस्कॅन करा. चाचण्याही करता येतील. यकृतावरील चरबी कमी करण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवा.

डॉ. सुनील एम. जैन मधुमेह आणि संप्रेरक तज्ज्ञ, टोटल डायबिटीस हार्मोन इन्स्टिट्यूट, इंदूर

बातम्या आणखी आहेत...