आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य:कोरोना पॉझिटिव्ह या पद्धतीने लढा आपली लढाई

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेराेना सध्या वाढतच चालला अाहे. या राेगावर अजून लस सापडलेली नाही.

काेराेना सध्या वाढतच चालला अाहे. या राेगावर अजून लस सापडलेली नाही. मात्र बरं होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सकारात्मक राहून रुग्णांनी या ४ पद्धतीने हा लढा लढायला हवा...

1. घाबरू नका

: आपल्याला काहीच झाले नाही असा विचार करा, घाबरू नका. सकारात्मक विचार करा. कारण कोरोना झालेले बरेच लोक निरोगी होऊन घरी परतले आहेत. केवळ वृद्ध आणि ज्यांना आधीपासून हृदय, बीपीसारखे गंभीर आजार आहेत, त्यांना बरं व्हायला थोडा उशीर लागतो. मात्र तेदेखील बरे होतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागा, लवकर बरे व्हाल.

2. सोशल मीडियापासून दूर राहा

: अशा वेळी अनेक लोक आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर करत आहेत. ते एक प्रकारे चांगले आहे. मात्र काही लोक तुमच्या पोस्टवर नकारात्मक टीका-टिप्पणी करू शकतात, त्यामुळे तुमचे मनोबल खचून जाईल, त्यामुळे शक्य तितके सोशल मीडियापासून दूर राहा. नाही तर आलेल्या कमेंेट्स वाचू नका.

3. रोगप्रतिकारशक्ती वाढवा :

या आजारात लढण्यासाठी सर्वात महत्त्वाची म्हणजे रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे आहे. हा आजार झाल्यावर आपण आपल्या दिनचर्येत थोडा बदल करायला हवा. सकाळी उठून योगाभ्यास करावा. त्याशिवाय गरम पाणी प्यावे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष्य मंत्रालयाने सांगितलेल्या नियमाचे पालन करा.

4. अध्यात्माचा आधार घ्या

: आपल्या कुटुंबापासून दूर एका खोलीत बंद एकटेच या महामारीसाठी लढण्यासाठी मानसिक आणि शरीरिक दृष्टीने बळकट व्हा. यासाठी अध्यात्माकडे वळा. आपल्या धर्माशी संबंधित ग्रंथांचे वाचन करा. यामुळे तुम्हाला मानसिक आधार मिळेल. यामुळे तुमचे ज्ञान वाढेल आणि सकारात्मक विचारात वाढ होईल.

गीतांजली कश्यप

बातम्या आणखी आहेत...