आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदारी:लस घेतल्यानंतरही मास्क का आवश्यक आहे, हे जाणून घ्या...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात लसीकरण सुरू झाले आहे. ही लस कोरोनापासून संरक्षण करेल, असे आतापर्यंतच्या परिणामांवरून स्पष्ट होते आहे. तरीही मास्क वापरणे आवश्यक आहे. कोरोनाबाधितांनाही लसीची गरज का आहे, याबद्दल वाचा...

कोरोनाच्या लसी माणसाला आजारापासून वाचवतील, हे निष्कर्षातून सिद्ध झाले आहे. परंतु संसर्ग पसरण्यापासून त्यामुळे प्रतिबंध होईल का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. फायझर व मॉर्डनाच्या चाचण्यांत लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होणाऱ्या अशा कितीतरी व्यक्ती आहेत, असे आढळून आले आहे. त्यामुळे काही लोकांना लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग झाला असावा. परंतु लसीमुळे त्याचा परिणाम त्यांच्यावर झालेला नसण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे अशी व्यक्ती नकळत दुसऱ्यालाही संसर्ग घडवू शकते. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील इम्यूनॉलॉजिस्ट मायकल टॅल यांनी सांगितले, “ लस घेतल्यानंतर मास्क घालण्याची आवश्यकता नाही, असे अनेकांना वाटणे शक्य आहे. परंतु लसीकरणानंतर त्यांनीही मास्क वापरलाच पाहिजे. कारण ते स्वत: विषाणूने आजारी पडणार नाहीत. परंतु लस न घेतलेल्या व्यक्तीला संक्रमित करू शकतात. ’

नाकाद्वारे संसर्ग पसरतो...
कोरोनासह बहुतांश श्वसनासंबंधी संसर्ग साधारणत: नाकात विषाणू झपाट्याने कैकपटीने वाढतात. यानंतर इम्यून सिस्टिम अँटीबाॅडी तयार करते. ही अँटीबॉडी विशेषत्वे म्यूकोसाला लक्षात घेऊन तयार होते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला पुन्हा संसर्ग झाला तर अँटिबॉडी व इम्यून सेल्स विषाणू ओळखून नाकातच नष्ट केले जातात. कोरोनाची लस नाकात नव्हे तर स्नायूमध्ये दिली जात आहे. यामुळे तयार होणारी अँटिबॉडी रक्ताद्वारे म्यूकोसापर्यंत पोहचते. परंतु नाकाला ती किती सुरक्षित ठेवेल, हे स्पष्ट नाही. लस घेतल्यानंतर रुग्ण आजारी पडणार नाही. परंतु दुसऱ्यास संक्रमित करू शकतो.
संशोधनातून परिणाम कळला.

बातम्या आणखी आहेत...