आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
साखर आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. डॉक्टरांनी तसेच वैज्ञानिकांनी हे सिद्ध केले आहे. पण प्रश्न असा आहे की आपण साखरच जर वापरली नाही तर गोडपणा कुठून मिळणार? आपणास साखरेऐवजी पाच पर्याय सांगत आहोत ज्यांचा वापर आपल्या आरोग्यास अजिबात नुकसानदायक नाही...
खडीसाखर : हा गोडव्यासाठी आरोग्यदायी पर्याय आहे. यातून पोषक तत्त्वेदेखील मिळतात. यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि खनिज आहे. ते रिफाइन केले नसल्यामुळे शरीरासाठी लाभदायक आहे.
नारळी साखर : नारळी साखरदेखील साखरेला चांगला पर्याय आहे. ही साखर नारळाच्या झाडामधून निघणाऱ्या गोड द्रव्यापासून तयार केली जाते. यात साखरेसारख्या कॅलरीज असल्या तरी ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा कमी असते. जे आपण सहज पचवू शकतो.
खजूर : एक उत्तम पर्याय आहे. कोरड्या खजुरांना बारीक करून साखरेऐवजी वापरा. ही पूड चॉकलेट, पेस्ट्री, सांजा, केक किंवा इतर पदार्थांमध्ये वापरली जाऊ शकते. याच्या सेवनामुळे हाडे मजबूत होतात.
गूळ : गुळाला शुद्ध (रिफाइन) करत नसल्याने यातून जीवनसत्त्वे, खनिजांसह पोषकद्रव्ये मिळतात. याचे गुणधर्म उष्ण असल्याने सर्दी खोकल्यासाठी उपयुक्त आहे.
कच्चा मध : बाजारात मिळणाऱ्या मधाऐवजी कच्चा मध घेतल्यास यातून गोडव्यासह वजन कमी होण्यास मदत होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.