आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादीर्घायुष्यासाठी व रोगांपासून बचावासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे, परंतु व्यग्र दिनचर्येमुळे व्यायाम सर्वात आधी थांबवला जातो किंवा अजिबात केला जात नाही. असे का करू नये, हे ही चार संशोधनावरआधारित तथ्ये स्पष्ट करतात.
१) रोज पाच मिनिटांचा व्यायामही लाभदायक
कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील मूव्हमेंट सायंटिस्ट कॅरोल इविंग गार्बर यांच्या मते, दिवसातून पाच ते दहा मिनिटे व्यायाम केल्याने केवळ चिंताच कमी होत नाही, तर झोपही सुधारते. तथापि, अमेरिकेच्या सीडीसीनुसार, निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी तरुणाने आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम व्यायाम केला पाहिजे.
२) हृदयगती वाढवणारे व्यायाम करावेत
तुमच्या हृदयाची धडधड सामान्यपेक्षा किंचित वेगवान करणारी कोणतीही शारीरिक क्रिया तुमच्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त हृदय गतीच्या ५० ते ७० टक्क्यांपर्यंत पोहोचलात तरीही ही क्रिया तुमच्यासाठी पुरेशी आहे. सध्याचे वय २२० मधून वजा करून जास्तीत जास्त हृदय गती मिळू शकते.
३) हृदयविकार, कर्करोग याचा धोका घटतो
अमेरिकेच्या मिनेसोटा विद्यापीठातील क्रीडा व व्यायाम मानसशास्त्रज्ञ बेथ लुईस म्हणतात, व्यायामाचा केवळ वजनावरच नव्हे, तर तुमच्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे केवळ वजन कमी होत नाही, तर हृदयविकार, अनेक प्रकारचे कर्करोग, नैराश्य, टाइप-२ मधुमेह, निद्रानाश यांसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.
४) आठवड्यात एकदा व्यायामही प्रभावी
जामा इंटरनॅशनल मेडिसिनमध्ये जुलै २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात सूचित केले आहे की, ज्या लोकांनी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा १५० मिनिटे व्यायाम केला त्यांना आठवड्यातून अधिक दिवस व्यायाम करणाऱ्यांसारखेच फायदे दिसले. हे संशोधन १० वर्षांपासून व्यायाम करणाऱ्या सरासरी ३.५ लाख लोकांवर करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.