आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहार्वर्ड इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, प्रोप्रिओसेप्शन म्हणजे शरीराची हालचाल, स्थिती आणि कृती करण्याची क्षमता. त्याच्या कमतरतेमुळे अपघात आणि जखमांचा धोका वाढतो. मायग्रेन, सांधेदुखी, हृदयविकार आणि दृष्टीशी संबंधित आजारांमुळे शारीरिक संतुलन बिघडते. हे चार व्यायाम केल्याने शरीराचा समतोल तर सुधारतोच, शिवाय शारीरिक बळकटीही वाढते.
१) टेबल टॉप
गुडघे आणि हाताच्या साह्याने टेबलाच्या स्थितीत या.
खाली जमिनीकडे पाहत उजवा हात आणि डावा पाय एकत्र पसरवा. पाठ सरळ आणि पोट घट्ट ठेवा. ३ ते ५ सेकंद थांबा. आता दुसऱ्या बाजूने असेच करा. प्रत्येक बाजूला १० वेळा करा.
अॅडव्हान्स : डोळे
बंद करून
एका वेळी २० सेकंद
थांबा.
२) सिंगल लेग
-नितंबांच्या बरोबरीने पाय पसरून उभे राहा.
-उजवा पाय सुमारे ९० अंश वाकवा आणि ३ ते ५ सेकंद तसेच राहा.
-आता पूर्वीच्या स्थितीत या.
-प्रत्येक पायाने पाच वेळा पुनरावृत्ती करा.
अॅडव्हान्स : कसलाही आधार न घेता डोळे मिटून व्यायाम करा. एका पायाने १० सेकंद होल्ड करा. प्रत्येक पायाने ही प्रक्रिया १० वेळा पुन्हा करा.
३) क्रॉस ओव्हर वॉक
-पाय आणि हात लांब करून उभे राहा.
-आता डाव्या पायाने उजवा पाय क्राॅस करून उजवीकडे जा.
-सुमारे ४५ फूट अंतर चालावे. आता उजव्या पायाने असेच करा.
अॅडव्हान्स : गुडघा किंचित उंच करून हे अधिक वेगाने करा. एका बाजूकडून सुमारे ७५ फूट अंतर जा.
४) स्क्वॅट जम्प
-आपले पाय थोडेसे पसरवून उभे राहा.
-आपली कंबर सरळ ठेवून मांड्या जमिनीच्या समांतर होईपर्यंत खाली या.
-आता शक्य होईल तितक्या वेगाने वरच्या बाजूला जा.
-ज्या स्थितीत उडी मारली होती त्याच स्थितीत खाली या.
-पाठ सरळ करा आणि हातांनी जोर लावून पुन्हा उडी मारा. हे १० वेळा पुन्हा करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.