आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य चाचणी मार्गदर्शक:वयाचे चार महत्त्वाचे टप्पे, जाणून घ्या कोणत्या वयात कोणती टेस्ट करावी?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वयाच्या २० व्या वर्षापासून जवळजवळ प्रत्येक दशकानंतर शरीरात विविध बदल होतात. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, २० वर्षांनंतर महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. पुरुषांमध्ये वयाच्या ४० वर्षांनंतर मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) नुसार, जसजसे आपले वय वाढत जाते तसतसा त्याचा आपल्या त्वचेवर, आरोग्यावर आणि क्षमतेवर परिणाम होतो. व्यक्तीच्या चयापचय प्रक्रियेत बदल होतो. हृदयाचा कमकुवतपणा, लठ्ठपणा यांसारख्या समस्या वाढू लागतात. याशिवाय दात किडणे, हाडे कमजोर होण्याबरोबरच टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी होते. अशा परिस्थितीत दशक हा आधार मानून काही शारीरिक चाचण्या वेळोवेळी केल्या तर भविष्यात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, दृष्टिदोष, हाडांशी संबंधित विकार आणि गंभीर आजारांपासून बचाव करून आपण निरोगी राहू शकतो.

पहिला टप्पा : २०-३० वर्षे
एचपीव्ही चाचणी महिलांसाठी आवश्यक
ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) म्हणतात. याचे काही प्रकार स्त्रियांत कर्करोगाचा धोका वाढवतात. वयाच्या २०व्या वर्षी सुरू होते.

दुसरा टप्पा : ४०-५० वर्षे
रक्तदाब, कोलेस्टेरॉल, मधुमेह, किडनी, हृदय, त्वचा कर्करोग, डोळे व दंत तपासणी
महिला व पुरुष दोघांसाठीही आवश्यक
डब्ल्यूएचओच्या मते, हृदयविकाराच्या झटक्याने २२% महिलांचा मृत्यू होतो. रक्तदाब, कोलेस्टेरॉल असे घटक जबाबदार.

तिसरा टप्पा : ५१-६५ वर्षे
स्टूल टेस्ट, मेमोग्राम, ऑस्टिओपोरोसिस
महिलांना मेमोग्रामसह तिन्ही, पुरुषांनी दोन चाचण्या केल्या पाहिजेत
कोलन कॅन्सरची (आतड्याचा कर्करोग) ९०% प्रकरणे पन्नाशीनंतर आढळतात. स्तन कर्करोगासाठी मॅमोग्राम चाचणी केली जाते.

चौथा टप्पा : ६५ वर्षांपुढील
डोळे, कान व शरीर असंतुलन तपासणी
पुरुष आणि महिला दोघांसाठी आवश्यक
या वयानंतर रोग प्रतिकारशक्ती वेगाने कमी होते. दृष्टी आणि ऐकणे कमी होते. व्यक्ती पडण्याचा धोका वाढतो.

चांगल्या आरोग्यासाठी या तीन सवयीही आवश्यक
३० ते ४० मिनिटे व्यायाम : स्ट्रोकचा धोका २७% घटतो

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, दिवसातून ३०-४० मिनिटे व्यायाम केल्याने उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोका २७% कमी होतो.

निरोगी आहार : २:१:१ सूत्र अवलंबा
आहाराच्या ५०% म्हणजे २ भाग फळे व भाज्या, २५% म्हणजे एक भाग कर्बोदके आणि २५% म्हणजे एकूण अन्नाचा १ भाग प्रथिने. त्यामुळे शरीराला आवश्यक ते सर्व घटक मिळतात.

चांगली झोप : इम्युनिटी संतुलित राहते
झोप शरीरातील हार्मोन्स नियंत्रित करते, ते भूक, चयापचय, वाढ आणि उपचार नियंत्रित करतात. रोगप्रतिकारक शक्ती संतुलित राहते. माणसाला ७-९ तासांची झोप लागते.

डॉ. सुरनाजीत चटर्जी : सीनियर कन्सल्टंट, इंटर्नल मेडिसिन, अपोलो हॉस्पिटल, नवी दिल्ली

बातम्या आणखी आहेत...