आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरामदायी सामान्य तापमानातदेखील काही लाेकांना रात्री झाेपताना घाम येऊ लागताे. काही वेळा तर घामाचे प्रमाणदेखील जास्त असते. अशा वेळी कपड्यांसाेबत पांघरूणदेखील भिजून जाते. तुम्हीही खूप घामाघूम हाेऊन जागे हाेत असाल तर ही धाेक्याची घंटा आहे. अनेकदा ही गंभीर आजाराची लक्षणेही असू शकतात. शिकागाेमधील रश विद्यापीठातील मेडिसिन विभागाचे प्राेफेसर डाॅ. केट राेलँड म्हणाल्या, झाेपतेवेळी वारंवार घाम येणे हे गंभीर आजाराच्या सुरुवातीचे संकेत देणारे असू शकते.
ताप, वजन कमी हाेणे, थकवा, खाेकला, श्वासाेच्छ्वासास त्रासासाेबत घाम येणे, मलेरिया, लिम्फाेमा, कर्कराेग, एचआयव्ही एड्स, टीबीसारख्या गंभीर आजाराच्या सुरुवातीची लक्षणे असू शकतात. स्ट्राेक, डिसरिफ्लेक्सिया, ऑटाेनाॅमिक न्यूराेपॅथीमुळेदेखील झाेपताना घामाघूम हाेऊ शकते. त्याशिवाय अँक्झायटी डिसऑर्डर, लठ्ठपणा, हृदयराेग, लाे ब्लड प्रेशर, मधुमेह, पार्किन्सन हा आजारदेखील त्यामागील कारण असू शकते. इम्पिरियल काॅलेज लंडनमध्ये निद्रा संशाेधन विभागातील प्राेफेसर विल्यम विज्डन म्हणाले, झोपण्यापूर्वी आपण अनेकदा कोमट पाण्याने आंघोळ करतो. चांगल्या झोपेसाठी शरीराचे तापमान वाढवतो. मात्र रात्री पांघरूण घेतल्यामुळे शरीराचे तापमान खूप जास्त वाढते. ते नियंत्रित करण्याच्या प्रक्रियेत घाम येतो. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मात्र खोलीचे तापमान कमी केल्यानंतरही घाम येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला गरजेचा आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनचे प्रवक्ते डॉ. आंद्रिया मातसुमुरा यांचे म्हणणे असे की, झोपताना श्वास घेण्यातील अडचणीमुळे घाम येतो. स्लीप अॅप्निया, अनिद्रा, नार्कोलेप्सी त्याची कारणे असू शकतात. नैराश्य, मधुमेहाच्या औषधांनीही घाम येतो. झोपण्यापूर्वी व्यायाम, मद्यसेवन, जास्त खाणे टाळावे.
चांगल्या झोपेसाठी स्वच्छ आणि आरामदायी बिछाना असावा
झाेपेत घाम येणे ही महिलांमधील सामान्य समस्या आहे. अशा समस्येसह डाॅक्टरांकडे येणाऱ्या लाेकांची पाहणी केली. त्यात १० ते ४० टक्के महिलांनी कधी-कधी रात्री झाेपेत जास्त घाम येताे असे नमूद केले. म्हणूनच खाेलीचे तापमान १५-२० अंश सेल्सियस ठेवायला हवे. बिछाना आरामदायी असावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.