आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही दशकांपूर्वी भारतात स्वयंपाकासाठी मोठी लोकसंख्या कोळसा, लाकूड, रॉकेलचा वापर करायची. मात्र अलिकडील वर्षांत याची जागा एलपीजी गॅसने घेतली आहे. आता 30 कोटींहून अधिक एलपीजी आणि पीएनजी ग्राहक आपल्या देशात आहेत. याचा अर्थ असा आहे की देशातील जवळपास प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी एलपीजी गॅसचाच वापर होत आहे.
मात्र तुम्हाला माहिती आहे का? की स्वयंपाकादरम्यान गॅस शेगडीतून हानिकारक नायट्रोजन डाय ऑक्साईड वायू निघतो. हा वायू श्वसन नलिकेतून फुफ्फुसांत जातो. यामुळे लोकांना अस्थमा आणि श्वसनाशी संबंधित आजारांचा धोका असतो. इतकेच नव्हे, गॅस शेगडीतून मिथेन, बेन्झिन, हेक्झेन, टोलुईन वायूही निघतो. काही व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात, ज्यामुळे अस्थमा आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोका राहतो.
मुलांवर वाईट परिणाम होतो
जर तुम्ही अशा घरात राहत असाल जिथे किचनला कोणतेही व्हेंटिलेशन नाही, तर तिथे मुलांवर सर्वाधिक परिणाम होतो. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या एका संशोधनात सांगितले गेले की मुलांत अस्थमा होण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे.
दिल्लीच्या शादीपूरमधील पल्मनोलॉजिस्ट डॉ. राकेश कुमार यादव सांगतात की जर एखाद्या बालकाला आधीपासूनच अस्थमा आहे किंवा श्वास घेण्यास त्रास आहे तर गॅसचे एक्सपोजर त्याचा आजार आणखी वाढवेल. वारंवार खोकला येणे, बोलताना धाप लागणे, जोराने श्वास घेणे अशी लक्षणे नियमितपणे दिसल्यास अलर्ट होण्याची गरज आहे.
गॅस शेगडीचा धोका कसा आहे
गॅस शेगडीचा धोका अनेक गोष्टींवर अवलंबून असतो जसे - किचनमध्ये व्हेंटिलेशन कसे आहे, गॅस शेगडी किती जुनी आहे आणि कोणत्या स्थितीत आहे. हेही महत्वाचे आहे की तुमचा वापर कसा आहे.
जर कुणी चांगल्या व्हेंटिलेशन असलेल्या घरात गॅस शेगडी वापरत असेल तर धोका खूप कमी होतो.
गॅस शेगडी बंद ठेवल्यावरही गॅस निघतो
गॅस शेगडी बंद ठेवल्यावरही त्यातून मिथेन गॅस निघतो. याला ग्रीन हाऊस गॅस म्हटले जाते, जे ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार मानले जाते. जर एखाद्या घरात व्हेंटिलेशन ठिक नसेल तर एक तासापेक्षा जास्त कालावधीत हवेत नायट्रोजन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढलेले असते.
याविषयीचे संशोधन एन्व्हायरन्मेन्टल सायंस अँड टेक्नोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
इंडक्शन स्टोव्हचा वापर जास्त सुरक्षित
जर तुम्ही एखाद्या नव्या घरात जात असाल किंवा किचन रिनोव्हेट करत असाल तर एलपीजी गॅसऐवजी इलेक्ट्रिक किंवा इंडक्शन स्टोव्हचा वापर जास्त सुरक्षित आहे. जर्नल ऑफ अॅलर्जी अँड क्लिनिकल इम्युनोलॉजीत प्रकाशित एका संशोधनानुसार गॅस शेगडीऐवजी इलेक्ट्रिक शेगडीचा वापर केल्यास अस्थमाचा धोका कमी होतो. डॉक्टरांचे म्हणणे आहे की चहा, पास्ता बनवण्यासाठी पाणी गरम करण्यासाठी गॅस शेगडीचा वापर केला नाही पाहिजे. याऐवजी इंडक्शन स्टोव्हचा वापर केला पाहिजे.
किचनमध्ये रेंज हूडचा वापर करा
जर एलपीजी गॅस शेगडीवर स्वयंपाक करत असाल तर लक्षात ठेवा की किचनमध्ये चांगल्या दर्जाचे रेंज हूड किंवा एक्झॉस्ट हूड लावलेले असेल. रेंज हूड मेकॅनिकल फॅनने युक्त एक असे उपकरण आहे जे स्टोव्हच्या अगदी वर असते. ही चिमणी एक प्रकारे फिल्टरचे काम करते. किचनमधील धूर, वाफ, उष्णता बाहेर फेकते.
अशा पद्धतीने किचनमध्ये एअर प्युरिफायरचाही वापर केला जाऊ शकतो. एअर प्युरिफायर किचनमधील अॅलर्जन्स आणि एअर बॉर्न पार्टिकल्स बाहेरटाकते. सामान्यपणे आपण बेडरूममध्ये एअर प्युरिफायर लावतो, किचनमध्ये नाही. मात्र हे किचनमध्येही लावायला हवे.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.