आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच गर्भात पॉम्पे आजारावर उपचार:ज्या आजाराने आयलाच्या बहिणींचा मृत्यू, डॉक्टरांनी त्यापासून वाचवले

ओंटारियो5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडाच्या ओंटारियोत राहणाऱ्या 17 महिन्यांच्या आयला बशीरच्या दोन्ही बहिणींचा जनुकीय आजार पॉम्पेमुळे मृत्यू झाला होता. मात्र ती या आजारापासून पूर्णपणे सुरक्षित आहे. डॉक्टरांनी आयलाच्या जन्मापूर्वीच तिच्यावर उपचार केले होते.

असे जगातील पहिलेच प्रकरण

जगात प्रथमच एखाद्या बालकाच्या आजारावर जन्मापूर्वीच उपचार करण्यात आले होते. ते यशस्वी ठरल्याचे डॉक्टरांनी आता सांगितले आहे. अमेरिका आणि कॅनडातील संशोधकांनी एका नव्या तंत्रज्ञानाने या दुर्मिळ जनुकीय आजारावर उपचार केले होते.

17 महिन्यांची आयला सामान्य बालकांप्रमाणे पूर्णपणे निरोगी आहे.
17 महिन्यांची आयला सामान्य बालकांप्रमाणे पूर्णपणे निरोगी आहे.

काय असतो पॉम्पे आजार?

आयलाच्या कुटुंबीयांना एक असा जनुकीय आजार आहे, ज्यात शरीरातील पेशी ग्लायकोजेन नावाची कॉम्प्लेक्स शुगर एकत्र होते. यामुळे शरीरात काही किंवा सर्व प्रोटीन तयार होत नाही. यामुळे आजारग्रस्ताचा मृत्यू होतो. डॉक्टरांनी आयलावर ज्या पद्धतीने उपचार केले त्याचा तपशील न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झाला आहे.

गर्भनाळेतून भ्रूणाला दिले खास एन्झाईम

ओटावा रुग्णालयातील भ्रूण औषध तज्ज्ञ डॉ. कॅरेन फंग सांगतात की डॉक्टरांनी गर्भनाळेतून आयलाला महत्वाचे एन्झाईम दिले. गर्भ धारणेच्या 24 आठवड्यांनंतर हे उपचार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...