आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय शास्त्र:मुलांमधील दुर्मिळ आजार शोधण्यासाठी जिनोम चाचणी

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही वर्षांत डॉक्टरांनी ७,००० दुर्मिळ आजार ओळखले आहेत. ग्लोबल जीन्स या अमेरिकन ग्रुपच्या मते, जगातील ४० कोटींहून अधिक लोक अशा आजारांनी ग्रस्त आहेत. अशा रुग्णांची संख्या कमी असल्याने आणि त्यांची लक्षणे खूप उशिरा ओळखली जात असल्याने त्यांच्यावर उपचार करणे कठीण आहे. अनेक देशांतील डॉक्टर जन्माच्या वेळी बाळाच्या संपूर्ण जिनोमची तपासणी करण्याच्या प्रकल्पावर काम करत आहेत, जेणेकरून आजार लवकर शोधून त्यावर उपचार करण्यात मदत होईल.

अमेरिकेत बोस्टन चिल्ड्रन्स हॉस्पिटल, कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि रेडी चिल्ड्रन्स हॉस्पिटल सॅन दिएगो येथे हे प्रकल्प सुरू आहेत. हार्वर्ड येथील बेबीसेक ग्रुपला १,००० मुलांच्या जिनोम चाचणीसाठी पैसे मिळाले आहेत. स्क्रीन ४ केअरचा पाच वर्षांचा प्रकल्प युरोपमध्ये सुरू होत आहे. ऑस्ट्रेलिया, चीन आणि कतारमध्येही यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण, सर्वात महत्त्वाचा प्रकल्प ब्रिटनमध्ये आहे. जिनोमिक्स इंग्लंड ही सरकारी कंपनी प्रौढांमधील कर्करोग आणि आनुवंशिक आजारांची तपासणी करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. आता कंपनी दोन लाख मुलांच्या जिनोमची छाननी करण्याचा प्रकल्प हाती घेत आहे. अनेक पालक संपूर्ण जिनोम चाचणीच्या बाजूने नाहीत. मुलांना सामान्यत: होत असलेल्या आजारांचीच तपासणी करावी, असे त्यांना वाटते. त्यामुळे जिनोमिक्स इंग्लंड सावधगिरी बाळगेल.

बातम्या आणखी आहेत...