आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रीचे विज्ञान:तीन ते सहा घनिष्ठ मित्र असल्यास जीवन आनंदी व आरोग्य राहते उत्तम

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैत्री आणि एकटेपणाचा थेट आरोग्याशी संबंध असतो. संपन्नता आणि उत्तम आरोग्यामध्ये मैत्रीची महत्त्वाची भूमिका असते. दुसरीकडे, एकाकीपणा आणि सामाजिक विलगीकरणामुळे नैराश्य, हृदयविकार आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी, उटाह येथील न्यूरोसायन्स आणि सायकाॅलॉजीच्या प्राध्यापक ज्युलियन होल्ट-लुन्स्टॅड यांनी केलेल्या अध्ययनाचा निष्कर्ष सांगतो की, एकाकीपणा आरोग्यासाठी दिवसातून १५ सिगारेट ओढण्याइतका हानिकारक आहे. त्यामुळे मित्रांची आदर्श संख्या किती आहे, हा प्रश्न स्वाभाविक आहे, असे डॉ. होल्ट म्हणतात. तीन ते सहा घनिष्ठ मित्र ही संख्या चांगली आहे, यावर अनेक संशोधक सहमत आहेत.

कन्सास विद्यापीठातील संवाद आणि कम्युनिकेशन स्टडीजचे प्राध्यापक जेफ्री हॉल म्हणतात की, आयुष्यात किमान एक जवळची व्यक्ती असावी. ती पत्नी, पालक, मित्र किंवा इतर कोणीही असू शकते. तरीही, चांगले जीवन जगायचे असेल आणि लोकांशी जोडले जायचे असेल, तर अधिक मित्र बनवण्यात काही गैर नाही. ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ रॉबिन डनबर यांचे गणित असे की मानव एका वेळी फक्त १५० लोकांशी संवाद साधू शकतो. इतर काही संशोधनांत ही संख्या जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात पाच घनिष्ठ मित्रांच्या अंतर्मनाचा समावेश आहे. बाकीचे सामान्य मित्र असू शकतात.

इतर अनेक अंदाज तीन ते सहा मित्रांना आदर्श मानतात. २०१६ च्या अध्ययानानुसार, ज्या लोकांचे सहा किंवा त्याहून अधिक मित्र आहेत त्यांचे आरोग्य आयुष्यभर चांगले असते. नॉर्थ इलिनॉय विद्यापीठातील समुपदेशन आणि उच्च शिक्षण विभागातील प्राध्यापक सुझान डेगेस यांनी केलेल्या २०२० च्या अध्ययनात आढळून आले की, तीन किंवा अधिक मित्र असलेल्या मध्यमवयीन स्त्रिया त्यांच्या जीवनात अधिक समाधानी आहेत. डॉ. डेगेस यांनी नुकतेच २९७ प्रौढांचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणातील ५५ टक्के सहभागींना वाटते की, दोन किंवा तीन घनिष्ठ मित्र आदर्श आहेत, तर ३१ टक्के लोकांना वाटते की, चार ते सहा मित्र पुरेसे आहेत.

घनिष्ठ मैत्री निर्माण होण्यासाठी हवे २०० तास
प्रौढ झाल्यावर मित्र बनवणे सोपे नाही. संशोधन सुचवते की, नवोदितांवर विश्वास ठेवण्यात अडचण व वेळेचा अभाव यामुळे हे घडते. त्यामुळे तुटलेली किंवा कमकुवत झालेली जुनी नाती पुनरुज्जीवित करणे अनेकदा सोपे जाते, असे मानसशास्त्रज्ञ मारिसा फ्रँको म्हणतात. मैत्री सहज होईल, असे समजू नका. त्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. डॉ. जेफ्री यांच्या अलीकडील संशोधनानुसार, घनिष्ट मैत्री निर्माण होण्यासाठी २०० तास लागतात.

बातम्या आणखी आहेत...