आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Organic Tulsi Green Tea Powerful Health Benefits  |natural Healing Powers | Immunity Booster   | Tulsi Queen Of Herbs

फीचर आर्टिकल:आपल्या आरोग्याला द्या ऑरगॅनिक तुलसीची शक्ती, ताणतणावापासून मुक्ती; इम्युनिटीचा होईल विकास

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या धकाधकीच्या जीवनात, प्रदूषण व संसर्गजन्य आजारांच्या वातावरणात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे व तन-मन शांत ठेवणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. हे काम एक कप गरम चहाने होत असेल तर त्याहून चांगली कोणती गोष्ट असू शकते. तुलसी चहा हा भारतातील सर्वात आरोग्यदायी व आरामदायी चहा मानला जातो. ऑरगॅनिक तुलसीसबोत ग्रीन टी व इतर निरोगी सुगंधी औषधी व औषधी वनस्पतींचा मिलाप झाला तर सोन्याहून पिवळे होईल.

तुलसी आहे क्वीन ऑफ हर्ब्स
तुलसीचे भारतीय संस्कृतीशी जुने नाते आहे. भागवत पुराणात तुलसीला औषधींची राणी म्हटले आहे. आयुर्वेदातही तुलसीला खूप महत्व आहे. तिला अतुलनीय म्हटले गेले आहे. जगाला या तुलसीचे फायदे समजावून सांगण्यासाठी ऑरगॅनिक इंडियाची खूप मोठी भूमिका आहे. 1997 मध्ये ऑरगॅनिक इंडियाची तुलसी टी मार्केटमध्ये आली. ऑरगॅनिक इंडियाने हे चमत्कारिक औषध आरोग्याच्या क्षेत्रात पुन्हा प्रस्थापित करून देशात ऑरगॅनिक क्रांतीची सुरुवात केली.

तुलसी व ग्री टी मिळून तयार होते एक आरोग्यदायी पेय

तुलसीचे फायदे

1. तणाव कमी करणे - काही अभ्यासांद्वारे असे दिसून आले आहे की, तुळस कोर्टिसोल हार्मोनचे संतुलन राखण्यास मदत करते. कोर्टिसोल हे शरीरातील मुख्य ताण संप्रेरक असल्याचे म्हटले जाते. कोर्टिसोलची पातळी नियंत्रणात ठेवल्याने तुम्हाला तणावमुक्त राहण्यास मदत होऊ शकते.

-ऑरगॅनिक इंडियाची तुलसी ग्रीन टी अश्वगंधामध्ये तुळशीसह अश्वगंधाचे गुणधर्म आहेत, जे तणाव कमी करण्यास व शरीरातील अँटिऑक्सिडंट्सची पातळी वाढवण्यास मदत करतात. याशिवाय तुळशीतील सुगंधी घटक नैसर्गिक पद्धतीने एन्जाइटी व स्ट्रेस कमी करून संवेदना शांत करतात.

2. अँटी-ऑक्सिडंट्स – तुळशीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात. हे अँटी-ऑक्सिडंट्स लवकर म्हातारे बनवणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून शरीराचा बचाव करतात. तसेच प्रदिर्घ काळापर्यंत निरोगी ठेवण्यासही मदत करतात.

-ऑरगॅनिक इंडियाची तुलशी ग्रीन टी चमेली, तुलसी क्लासिक व तुलसी ओरिजिनलमध्ये नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात.

3. रोगप्रतिकारशक्ती वाढवते- तुलशी इम्युनिटी म्हणजे शरीराला वेगवेगळ्या आजारांशी लढणारी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. तुलसीमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, झिंक व लोहासह सायट्रिक टार्टरिक व मॅलिक अॅसिडही असते. यात अँटी इन्फ्लेमेटरी व बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतो. ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

-तुलसी जिंजर टर्मरिकमध्ये तुळशी, आले व हळद यांचे अप्रतिम मिश्रण आहे. हे मिश्रण केवळ चवीत अतुलनीय नाही, तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासही लाभकारक आहे. तुलसी ग्रीन टी लेमन जिंजरमध्ये लेमन ग्रास, तुलसी, प्रिमियम ग्रीन टीसह चवदार व स्वादिष्ट आल्याचे मिश्रण आहे जे एंटी इंफ्लेमेटरी व अँटीबॅक्टेरियलचे काम करते.

4. मेटाबॉलिज्म चांगले ठेवते- तुलसीमध्ये इसेंशिअल ऑयल, व्होलेटाइल ऑयल आढळते. त्यात अँटीबॅक्टेरिअल, अँटीव्हायरल, अँटीफंगल व अँटिसेप्टिक गुणधर्म असतात. ते शरीरातून टॉक्सिक पदार्थ बाहेर काढून शरीराचे मेटाबॉलिज्म म्हणजे चयापचय शक्ती वाढवते. यामुळे वजनही नियंत्रित राहते.

-तुलसी ग्रीन टी हनी लेमन हेल्दी मेटाबॉलिज्मला प्रोत्साहन देते. हे वजन संतुलित ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. याशिवाय ते फॅट कमी करण्यातही सहकार्य करते. दुसरीकडे, पारंपारिक काश्मिरी ग्रीन टी आणि संपूर्ण मसाल्यांसोबत तुळशी डिटॉक्स कहवा तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते, पचनशक्ती वाढवून वजन कमी करण्यास मदत करते.

5. सर्दी, श्वसनाच्या समस्यांपासून आराम- तुलसीचे सेवन कफ, खोकला, सर्दी, ब्राँकायटिस सारख्या श्वसनाच्या समस्यांवर फायदेशीर आहे. त्यात इम्युनोमोड्युलेटरी अँटीट्यूसिव्ह व एक्सपेक्टोरेंट असतात, जे कफ व श्लेष्मापासून मुक्ती देतात. तुलसीमध्ये असणारे विशेष प्रकारचे तेलही शरीराला आराम देतात.

-तुलसी मुलेठीचे तुलसी, मुलेठी, पीपरमिंट व बडीशेपचे आरोग्यदायी मिश्रण गळ्याची खवखव दूर करून कोरड्या खोकल्यातून आराम देण्यास मदत करतो. दुसरीकडे, तुलसी ग्रीन टी क्लासिकमध्ये प्रिमियम ग्रीन टी व तुलसीचे उत्कृष्ट मिश्रण असून, त्यात नैसर्गिकपणे अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे तुमची सर्वसामान्य आजारांपासून सुरक्षा करते.

6. स्टॅमिना वाढवण्यात मदत - तुलसी स्टँमिना वाढवण्यातही मदत करते. त्यात मॅग्नेशिअम, लोह, व्हिटॅमिन A, C व K आढळते. ते रक्तवाहिन्यांना लवचिक बनवून आर्टरितील क्लॉटिंग रोखते. यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहून शरीराची ताकद वाढते. तुलसीमध्ये आरजीनीन नामक एक अॅमिनो असीड असते, जे पुरुषांच्या शुक्राणुंना हेल्दी बनवते.

ग्रीन टीचे फायदे

1. वजन कम करण्यासाठी लाभदायी - ग्रीन टीमध्ये उपलब्ध अंटी ऑक्सिडंट्स, मेटाबॉलिज्मला वाढवून वजन कमी करण्यास मदत करतात. काही संशोधनांनुसार, ग्रीन टीमध्ये अस्तित्वात कॅटेचिन व कॅफीनचे मिश्रन वजन कमी करण्यात व वजन संतुलित ठेवण्यात काहीअंशी मदत करते.
2. साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त- ग्रीन टीमध्ये असलेले पॉलिफेनॉल रक्तातील साखरेचे प्रमाण कमी ठेवते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे.
3. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत - ग्रीन टीमध्ये असलेले व्हिटॅमिन क वाढलेला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. बीपी नियंत्रित करण्यासाठी अँजिओटेन्सिन-कन्व्हर्टिंग एन्झाइमची (ACE) गरज असते. तथापि, ग्रीन-टी नैसर्गिक ACE म्हणून कार्य करते.
4. कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण - ग्रीन टीच्या सेवनाने चयापचय वाढते व कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.
5. हृदयविकारांपासून बचाव करते - एका अभ्यासानुसार, ग्रीन टी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग व त्याची सर्व कारणे कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन, पॉलीफेनोलिक संयुगे असतात, जे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली मजबूत करून हृदयरोगापासून संरक्षण करतात.
6. इम्युनिटी वाढवण्यास उपयुक्त – ग्रीन टीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकतात. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि आजारांचा धोका कमी होतो.
7. तणावमुक्ती - ग्रीन टी तणाव कमी करून मेंदूची कार्यप्रणाली दुरुस्त करते. याशिवाय ते एकाग्रता वाढवण्यातही सकारात्मक परिणाम दर्शवू शकते.

तुलसी ग्रीन टी क्लासिकसह तुमच्या दिवसाची शक्तिशाली व उत्साहवर्धक सुरुवात करा

तुमच्या दिवसाची सुरुवात ऑरगॅनिक इंडियाच्या तुलसी ग्रीन टी क्लासिकने करा. तुलसी तुमच्या शरीराचा नैसर्गिक पीएच संतुलन राखण्यास मदत करते, तणाव कमी करते, प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि स्टॅमिना वाढवते. ग्रीन टी सोबत घेतल्यास तुळशीचे औषधी गुणधर्म अनेक पटींनी वाढतात. तुलसी ग्रीन टी हे क्लासिक प्रीमियम ग्रीन टी व तुळशीचे परिपूर्ण मिश्रण आहे. तुळशीचे औषधी गुणधर्म तणाव व थकवा दूर करण्याचा सर्वात योग्य उपाय आहे. हे चयापचय व्यवस्थित ठेवून वजन कमी करण्यास मदत करतात. याशिवाय ते चरबी बर्न करून इम्युनिटीही वाढवते. यात नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्समध्ये मुबलक प्रमाणात असते.

तुलजी जिंजर टर्मरिक - साधारण सर्दीपासून आराम देण्यासोबतच लिव्हरसाठीही फायदेशीर

तुलसी जिंजर टर्मरिकमध्ये तुळशी, आले व हळद यांचे अप्रतिम मिश्रण आहे. जे केवळ चवीत अतुलनीय नाही तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास देखील मदत करते. यामुळे तणाव व थकवा दूर होतो. सामान्य सर्दी -खोकल्यापासून आराम देते व रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून अनेक रोगांपासून संरक्षण करण्यासही मदत करते. त्याचे औषधीय घटक इन्फ्लेमेशन कमी करण्यासह लिव्हर अर्थात यकृताचे कार्यही सुरळीत करतात.

तुलसी ग्रीन टी हनी लेमन - चयापचय वाढवते तथा अतुलनीय चव व ताजेपणासह वजन कमी करण्यास मदत करते

तुलसी ग्रीन टी हनी लेमनमधील प्रिमियम ग्रीन टी अर्कामुळे त्याला एक अनोखी चव मिळते. त्याचा लेमन फ्लेवर त्याचा ताजेपणा वाढवते. ते वजन संतुलित ठेवण्यास मदत करणाऱ्या हेल्दी मेटाबॉलिज्मला प्रोत्साहन देतो. याशिवाय फॅट कमी करण्यासही उपयुक्त आहे.

तुलसी मुलेठी - घशाची खवखव दरू करून खोकल्यापासून आराम देतो

तुलसी मुलेठीत तुलसी, मुलेठी, पीपरमिंट व बडीशेपचे आरोग्यदायी मिश्रण आहे. हे चवदार मिश्रण गळ्याची खवखव दूर करून कोरड्या खोकल्यापासून आराम देण्यास मदत करते. मसालेदार व गोड चव असलेले हे पेय सर्दी-खोकला व घशाच्या सामान्य समस्यांमध्येही फायदेशीर आहे.

ऑर्गेनिक इंडियाची उत्पादने दुसऱ्यांहून का वेगळी आहेत?
बाजारात सध्या तुलसी उत्पादने मुबलक प्रमाणात आहेत. पण ऑरगॅनिक इंडियाच्या उत्पादनामध्ये माती परीक्षण, पेरणीपासून कापणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर, तुमच्यापर्यंत पोहोचणारे उत्पादन पूर्णपणे सेंद्रिय असेल. त्यात कोणत्याही प्रकारची कीटकनाशके, जड धातू, रसायने आदी नसतील याची पुरेपूर काळजी घेतली जाते. ऑरगॅनिक इंडिया उत्पादने तुमच्यापर्यंत अत्यंत कठोर परिक्षणातून गेल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेबद्दल तुम्ही खात्री बाळगू शकता.

बातम्या आणखी आहेत...