आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिवाळ्यात अनेक लोक विंटर ब्ल्यू म्हणजेच सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डरने पीडित असतात. यामुळे मूड स्विंग, एंग्झायटी आणि अनेकदा डिप्रेशनसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
फिजिशियन डॉ. श्रीतेश मिश्रांचे म्हणणे आहे की, हिवाळ्यात लाईफ स्लो होते. याशिवाय हिवाळ्यात आपली एनर्जी लेव्हलही डाऊन असते. रात्र मोठी असल्याने आपली दिनचर्या बिघडते. तर दिवस लहान आणि ढगाळ असल्याने कमी ऊन मिळते आणि याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर होतो.
तुम्हाला विंटर ब्ल्यू आहे हे कसे ओळखावे?
हिवाळ्यामुळे आपली शारीरिक हालचाल कमी होते. थंडीमुळे आपल्याला कमी शारीरिक श्रम करावे वाटतात. हळू-हळू आपली दिनचर्या पूर्णपणे बिघडते. विशेषतः जेव्हा ऊन पडत नाही, तेव्हा आपल्याला आतून खूप वाईट वाटते. असे वाटते की शरीरात ऊर्जा उरली नाही. आपण निराश राहतो आणि विशेषतः सर्वांपासून वेगळे राहणे तुम्हाला आवडू लागते. तुम्हाला माहिती आहे का ही सर्व लक्षणे विंटर ब्ल्यू म्हणजेच हंगामी अफेक्टिव्ह डिसऑर्डरचे संकेत असतात.
शरीरातील संप्रेरकांचे प्रमाण कमी-जास्त होते
हिवाळ्यात सिरेटोनिन म्हणजेच फील गूड हार्मोनची पातळी कमी व्हायला लागते. ज्याचा थेट परिणाम आपल्या मूडवर होतो. ही पातळी कमी होणे हेच आपला आळस आणि निराश वाटण्याचे सर्वात मोठे कारण असते.
तर मेलॅटोनिन हार्मोन वाढल्याने थेट परिणाम झोप आणि स्वभावावर होतो. हिवाळ्यात लवकर अंधार पडतो आणि उशिरा दिवस उगवतो. ज्यामुळे शरीरात मेलॅटोनिनची पातळी वाढते आणि आपल्याला आळसावल्यासारखे वाटते.
हिवाळ्यात गरजेचे आहे व्हिटॅमिन डी घेणे
हिवाळ्यात शरीरात व्हिटॅमिन डी तयार करण्याचा सर्वात मोठा स्रोत ऊन असते. यामुळे शरीरात सेरेटोनिनची पातळी वाढते. यामुळे मेंदूतील हायपोथेलॅमस ग्रंथी सक्रीय होते. यामुळे झोप, मूड आणि भूकेसारख्या गोष्टी नियंत्रित राहतात. यासाठी तज्ज्ञ सल्ला देतात की, थंडीत किमान अर्धा तास तरी उन्हात बसले पाहिजे.
सफरचंद, केळी आणि अननसाचा आहारात समावेश करा
जास्त प्रमाणात कॅफिन, प्रक्रिया केलेले अन्न आणि रिफाईन्ड शूगरसारख्या गोष्टी मानसिक आरोग्याच्या समस्या वाढवतात. म्हणून हिवाळ्यात हिरव्या भाज्या आणि सुकामेवा विशेषतः मनुके खाण्याचा प्रयत्न करा. आहारात फळांचा समावेश करा. सफरचंद, केळी आणि अननससारखी फळे खा. ती उच्च कार्बोदकयुक्त असतात. यामुळे सेरोटोनिन हार्मोन रिलीज होते आणि मूड चांगला होण्यात मदत होते.
डार्क चॉकलेट खाल्ल्याने होईल एनर्जी बूस्ट
डार्क चॉकलेटही मूड स्विंग आणि डिप्रेशनमध्ये खूप चांगले मानले जाते. यात पॉलिफिनॉल्स, अँटिऑक्सिडंट गुण असतात, जी आरोग्यासाठी चांगली मानली जातात. ही खाल्ल्याने ऊर्जा वाढवण्यास मदत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.