आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फिटनेस :लॉकडाऊनमध्ये आरोग्य सुधारले, भारतीयांच्या हृदयाचे ठोके कमी झाले; झोपण्याच्या वेळेतही 14 मिनिटांची झाली वाढ

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • ज्या देशात लॉकडाऊन प्रभावी नव्हते, तेथे आरोग्यात जास्त सुधारणा नाहीत

कोरोना विषाणूमुळे देशभरात झालेल्या लॉकडाऊनने देशाचा वेग कमी केला असला तरी भारतीय तरुणांच्या आरोग्यासाठी फायदेशीर राहिले. या दरम्यान युवक घरी राहिले व आराम केला, यामुळे त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग कमी होता. एका खासगी फिटनेस ट्रॅकिंग ब्रँडच्या डेटानुसार देशात १८ ते २९ वर्षांच्या तरुणींच्या रेस्टिंग हार्ट रेटमध्ये मिनिटामागे २.५६ ची घट झाली. याच वयाच्या रेस्टिंग हार्ट रेटमध्ये मिनिटामागे २.३५ ची घट झाली. हे ऐकण्यात जास्त नसले तरी आकड्यांनुसार हा खूप मोठा बदल आहे. रेस्टिंग हार्ट रेट असा आकडा आहे ज्यात तुमच्या आरामाच्या स्थितीत तुमचे हृदय धडकते. यातून व्यक्तीचा फिटनेस आणि त्यांचे हृदय चांगले असल्याचे समजते. त्याद्वारे विविध आजारांचा परिणाम, उच्च तणावाची पातळी, झोपेची समस्या, डिहायड्रेशन आणि आरोग्याबाबतच्या इतर समस्यांची माहिती होण्यात मदत होते. 

अहवालानुसार लॉकडाॅऊन दरम्यान लोकांची पुरेशी झोप होणे, तणाव आणि थकवा कमी झाल्याने यात सुधारणा दिसली. या काळात देशातील प्रत्येक व्यक्तीची झोपण्याचा सरासरी वेळ १४ मिनिटांनी वाढला. म्हणजे लोकांनी या काळात चांगली झोप घेतली. अहवालानुसार भारताप्रमाणेच मेक्सिको, स्पेन, फ्रान्स आणि सिंगापूरच्या लोकांच्या हृदयाच्या आरोग्यात सर्वाधिक सुधारणा दिसून आली. तर, स्वीडनमध्ये त्यात घट दिसली, तर ऑस्ट्रेलियात किरकोळ सुधारणा झाली. अहवालानुसार स्वीडन सारख्या देशात लॉकडाऊन पूर्णपणे प्रभावी नव्हते, यामुळे तेथील लोकांच्या हृदयाच्या ठोक्यात बदल झाला नाही. तर ऑस्ट्रेलियात सर्व वयाच्या लोकांच्या हृदयाच्या ठोक्यात खूप कमी किंंवा बदलच झाला नाही.


आधी झोपेसाठी ७.७ मिनिटे कमी वेळ द्यायचे, लॉकडाऊनमध्ये लवकर झोपतात

अहवालानुसार इतर दिवसांत भारतीय सरासरी ७.७ मिनिटे कमी झोप घेत होते. म्हणजे कमी आराम करत होते आणि झोपही कमी येत होती. लॉकडाऊन दरम्यान सर्व भारतीय घरी राहिले आणि वर्क फ्रॉम होम केले. यामुळे त्यांचे आरोग्य सुधारले. अहवालानुसार लॉकडाऊन दरम्यान वीकेंडमध्ये तरुण लवकर झोपू लागले, झोपण्याची वेळही जवळपास निश्चित झाली.

0