आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न विज्ञान:अन्न भरपूर चावा, पाणी सावकाश प्या; जाणून घ्या शरीरासाठी याचे काय मोठे फायदे आहेत

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेवताना अन्न नेहमी ३२ वेळा चावून खावे किंवा अन्न चावून खा, गिळू नका, असे वडीलधारे म्हणत असताना तुम्ही लहानपणी ऐकले असेल. खरे तर अन्नाचे पचन तोंडातून सुरू होते. अन्न चघळल्याने तोंडात तयार होणारी लाळ आपण खात असलेले अन्न मऊ करते आणि शरीराला आवश्यक हार्मोन्स सोडण्यासाठी पुरेसा वेळ देते. अन्न पचण्यासाठी ते शक्य तितक्या आतड्याच्या संपर्कात येणे आवश्यक आहे. म्हणून ते जितके जास्त चघळले जाईल तितकेच ते आतड्यांशी संपर्कात येईल. त्यामुळे अन्न पचवणारे एन्झाइम्स त्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील. तसेच चघळल्याशिवाय किंवा कमी चघळून खाण्याने जास्त खाण्याची शक्यता खूप वाढते.

Q. फायदा काय?
A. लठ्ठपणा, वजन कमी होईल
भूक आणि शरीरातील कॅलरीजचे प्रमाण प्रामुख्याने हार्मोन्सद्वारे नियंत्रित केले जाते. जेवणानंतर आतड्यात घ्रेलिन नावाचे हार्मोन कमी होते. त्यामुळे भूक नियंत्रित राहते. हे हार्मोन्सदेखील सोडते, त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. या संपूर्ण प्रक्रियेस सुमारे २० मिनिटे लागतात. एवढेच नाही, तर अन्न चघळल्याने आपली खाण्याची गती कमी होते, त्यामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी होते. परिणाम - वजन कमी. याने शरीराला आवश्यक तेवढेच मिळते.

Q. भूक घटली तर पोषण मिळेल?
A. पोषण कमी होणार नाही, वाढेल
अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमधील संशोधनानुसार, अन्न पुरेशा प्रमाणात चघळले जाते तेव्हा ते खूप लहान तुकड्यांमध्ये बदलते, ते गिळताना घशातील ताण कमी करते. त्याच वेळी, हे कण आतड्यांपर्यंत पोहोचतात तेव्हा ते एन्झाइम्समध्ये सहजपणे विरघळतात, त्यामुळे पोषण अधिक प्रमाणात तयार होते आणि शरीरात वेगाने शोषले जाते. अशा स्थितीत कमी अन्न असूनही शरीराला अधिक पोषण आणि प्रथिने मिळतात.

Q. मी अन्न चावून खाल्ले नाही तर काय नुकसान होईल?
A. यामुळे शरीरात १२ पेक्षा जास्त समस्या उद्भवू शकतात
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, आपण अन्न पुरेसे चघळत नाही तेव्हा पचनसंस्थेमध्ये गोंधळ होतो. शरीरात एन्झाइम्स पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत, त्यामुळे पोट फुगणे, जुलाब, छातीत जळजळ, जास्त प्रमाणात अॅसिड तयार होणे, पोटदुखी, नाक वाहणे, डोकेदुखी, चिडचिड, कुपोषण, अपचन आणि गॅस यांसारख्या समस्या उद्भवतात.

स्लो डाऊन फूड.... म्हणजे खाण्याचा वेग कमी करा
खरं तर, जलद खाल्ल्याने मेंदूला उशिराने पोट भरण्याचे संकेत मिळतात, त्यामुळे आपल्या कॅलरीजचे प्रमाण वाढते ... परिणाम - लठ्ठपणा.

डॉ. सुभाश्री रे : क्लिनिकल अँड पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन रिसर्चर

बातम्या आणखी आहेत...