आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्वर्ड रिसर्च:हेल्दी एजिंग म्हणजे निरोगी वृद्धत्व; झोप, आहार, वजन यावर अवलंबून असते आपले भविष्य...

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्दी एजिंग म्हणजे वय वाढल्यानंतरही शरीर चपळ आणि तंदुरुस्त राहणे. डब्ल्यूएचओच्या मते, २०३० पर्यंत दर सहापैकी एक व्यक्ती ६० किंवा त्याहून अधिक वयाची असेल. हार्वर्डच्या मते, ३० ते ४० या वयोगटात मेंदू संकुचित होऊ लागतो. वयानुसार हाडांची घनता कमी होऊ लागते. ती पातळ आणि नाजूक होऊ लागतात. त्याच वेळी रक्तवाहिन्या कडक झाल्यामुळे रक्तदाब वाढू लागतो. यामुळे हृदयाचे आजार होतात. वाढत्या वयासोबत सर्वाधिक परिणाम करणारे चार घटक आहेत.

झोप : फक्त ४ तास झोपेने १० वर्षे आधीच वृद्धत्व
अमेरिकन अॅकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनच्या संशोधनात दिसून आले की, एक दिवसाच्या अपूर्ण झोपेमुळेही २०% पर्यंत सतर्कता कमी होऊ शकते. झोपेच्या कमतरतेमुळे पेशी वृद्ध होऊ शकतात. फक्त ४ तास झोप घेणारे १० वर्षांनी मोठे दिसतात.
काय करावे : ठराविक वेळेत झोपणे आणि जागे होणे हा नित्यक्रम करा. तारुण्यापासूनच सरासरी ७ ते ८ तासांची झोप घ्या.

आहार : साखर, मैद्यामुळे जीवनसत्त्वांची कमतरता
जर्नल एजिंगनुसार, मैदा, शुद्ध साखर आणि शुद्ध तेलांनी बनवलेले पदार्थ शरीरातून पोषक तत्त्वे शोषण्यास मदत करतात, त्यामुळे शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता निर्माण होते. त्यामुळे शरीर लवकर वृद्ध होणे सुरू होते.
काय करावे : आहारात तीन भाग फळे आणि भाज्या असाव्यात. एक भाग धान्य आणि इतर गोष्टी घ्या. शरीराला पूर्ण पोषण मिळेल.

वजन : आपल्या पेशींचे नुकसान करते
वाढत्या वयानुसार पेशींचे चयापचय आणि ऊर्जा संतुलित करणारे हार्मोन्स कमी होऊ लागतात. विश्रांतीच्या स्थितीत चयापचय दर कमी होऊ लागतो. यामुळे वजनही वाढते. जास्त वजनामुळे पेशींचे नुकसान होते, त्यामुळे मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होतात.
काय करावे : हार्वर्डच्या मते, आठवड्यातून ३ दिवस ३० ते ४५ मिनिटांचा व्यायाम १० वर्षे अधिक तरुण ठेवतो.

जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करतो तणाव
दीर्घकाळ तणावाखाली राहिल्यामुळे आपल्या पेशींच्या डीएनएवर परिणाम होतो. पेशींच्या विभाजनाच्या वेळी हे डीएनए नवीन पेशींमध्ये पोहोचतात, त्यामुळे कमकुवत प्रतिकारशक्ती, थकवा, मधुमेह, कर्करोग इ.चे कारण ठरते.
काय करावे : तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगासने, श्वासोच्छ्वासाचे व्यायाम नियमित करावेत.

बातम्या आणखी आहेत...