हेल्थ / संसर्ग, अतिसार दूर करण्यासाठी कच्ची केळी उत्तम

  • कच्च्या केळीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते

दिव्य मराठी

Mar 25,2020 12:15:00 AM IST

पचनशक्ती वाढते

कच्च्या केळीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. सोबतच कच्ची केळी स्टार्च विरोधी क्षमतेने भरलेली असतात. त्यामुळे शरीराची पचनशक्ती वाढविण्याचे काम ते करतात. कच्ची केळी सहजपणे पचतात आणि आतडेही स्वच्छ राहते. पोटाच्या अनेक समस्या दूर करण्याचे काम कच्ची केळी करते.


भूक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त

खाल्ल्यानंतर पुन्हा-पुन्हा भूक लागत असेल.तर कच्ची केळी अवश्य खावीत. कच्च्या केळीमुळे वजन कमी होण्यास खूप मदत मिळते. कच्च्या केळीमध्ये फायबर अधिक असते त्यामुळे ते खाल्ल्यानंतर पोट खूप काळापर्यंत भरलेले वाटते.


शुगरसाठी फायदेशीर

रक्तात असलेले साखरेचे प्रमाण जर वाढले तर मधुमेह होण्याची भीती वाढते. यापासून आपले रक्षण करण्यासाठी कच्ची केळी फायदेशीर ठरते. कच्च्या केळीमध्ये स्टार्च विरोधी घटक आणि फायबरचं अधिक प्रमाण असल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यामध्ये किंवा नियत्रणात ठेवण्यास त्याचा उपयोग होतो.


पोटासाठी उत्तम

गॅस्ट्रोइंटेस्टायनल म्हणजेच पोटाचे आजार जसे की बद्धकोष्ठता, मूळव्याध, संसर्ग, अतिसार इत्यादी दूर करण्यासाठीही कच्ची केळी फायदेशीर ठरते.


कॅन्सरपासूनही वाचवते

योग्य वेळी उपचार न झाल्यास कॅन्सर हा आजार जीवघेणा ठरतो. कॅन्सरपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून कच्च्या केळीचा आपण वापर करू शकतो. कच्च्या केळीच्या पिठामध्ये स्टार्च प्रतिरोधी तत्त्वे असतात, जे कॅन्सरशी लढण्याची आपली क्षमता वाढवतात.


हृदयासाठी चांगले

हाय कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर हृदयाच्या आजारांचे मूळ कारण असते. आपले हृदय फिट ठेवण्याचे गुण त्यात आहेत. यात फायबर अधिक असल्याने कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहते.

X