आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोविडमुळे सर्वांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. आरोग्याला नवीन धोके उद्भवत आहेत. घराबाहेरचे काम, शाळा-कॉलेज बंद, यामुळे बसून राहण्याचे प्रमाण वाढले, हृदयविकाराचा धोकाही दीडपट वाढला आहे. हे टाळण्याचे मार्ग आहेत : दररोज ३० मिनिटे हसत राहा आणि ४५ मिनिटे व्यायाम करा.
हानिकारक
दिवसातून एक चमचाहून (५ ग्रॅम) जास्त मीठ खाऊ नये. अधिक साखरेचीही शरीराला आवश्यकता नसते. शरीराला आवश्यक साखर अन्नाद्वारे मिळते. अधिक साखरेच्या पेयांमुळे लठ्ठपणा, उच्च कोलेस्टेरॉल आणि मधुमेह होतो. दूध, चीज आणि मांसामध्ये संतृप्त चरबी असते, ते जास्त प्रमाणात खाऊ नका. रेड मीट, बेकरी उत्पादने, चिप्स, रेडी टू ईट पदार्थ हृदयाला हानी पोहोचवतात. या सर्व गोष्टी तुम्हाला लठ्ठ बनवतात आणि आपल्या हृदयासाठी हानिकारक असतात.
चांगले
निरोगी हृदयासाठी नियमित दिनचर्या आणि व्यायाम ३०% आणि चांगला आहार ७०% असे प्रमाण असावे. निरोगी हृदयासाठी आहारात ऑलिव्ह, नारळ आणि मोहरीचे तेल यांसारख्या हेल्दी फॅट्सचा समावेश असावा. संपूर्ण धान्ये, बीन्स, शेंगा, फळे आणि भाज्यांमध्ये फायबर असते. पालकात व्हिटॅमिन के असते. स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरीमध्येही घातक कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता असते. स्वयंपाकात कमी तेलाचा वापर करत भाजणे, वाफवण्याच्या पद्धतीचा अवलंब करा.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.