आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळद, मेथी आणि सुंठीमुळे वाढेल प्रतिकारशक्ती:खोकला आणि सांधेदुखीपासून मिळेल मुक्ती, वापराची योग्य पद्धत घ्या जाणून...

लेखक: भाग्य श्री सिंह2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हळद, मेथी आणि सुंठीचे कॉम्बिनेशन खूप हेल्दी आहे. सुंठीच्या लाडूमध्ये पीठ, हळद, मेथी, सुंठ आणि ड्रायफ्रुटस असतात आणि हे खूप हेल्दी असते. आयुर्वेदाचे तज्ज्ञ डॉ. अमित सेन यांच्याकडून जाणून घ्या हळद, मेथी आणि सुंठीचे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे आणि याचे सेवन कसे करावे?

हळदीतील पोषक घटक

हळदीत कॉपर, झिंक, फॉस्फरस, व्हिटामिन बी6 असते. सोबतच हळदीत अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सिडन्ट आणि अँटीफंगल घटकही असतात.

प्रोटिन, कॅल्शियमने भरपूर आहे मेथी

मेथीच्या दाण्यांत प्रोटिन, कॅल्शियम, आयर्न, फायबर, पोटॅशियम, व्हिटामिन सी, व्हिटामिन ए आणि व्हिटामिन के आढळते.

पोषक घटकांनी भरपूर आहे सुंठ

सुंठीत कॅल्शियम, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सेलेनियम, थायमिन, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी6, व्हिटामिन बी12, लिपिड अॅसिडसारखे पोषक घटक असतात.

अद्रक सुकवून सुंठ बनवली जाते.
अद्रक सुकवून सुंठ बनवली जाते.

सांधेदुखीपासून दिलासा

हळद, मेथी आणि सुंठीच्या पावडरमध्ये प्रोटिन, झिंक आणि अनेक व्हिटामिन असतात. ही खाल्ल्याने स्नायूंचा योग्य विकास होतो आणि स्नायू मजबूत होतात. सांधेदुखीची समस्या असेल तर मेथी आणि सुंठ भाजून पावडर बनवा आणि यात अर्धा चमचा हळद घआला. कोमट पाण्याने याचा लेप तयार करून लावा सांधेदुखीपासून आराम मिळेल.

प्रतिकारशक्ती वाढवते, आजार दूर करते

हळद, मेथी आणि सुंठीचे मिश्रण व्हिटामिन सी, झिंक आणि प्रोटिनने भरपूर असते. याच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढण्यास सक्षम होते. याच्या सेवनामुळे खोकलाही बरा होतो.

मेथीच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक असतात.
मेथीच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक असतात.

वात-कफ दोषात आराम मिळेल

हळद, मेथी आणि सुंठ नैसर्गिकरित्या उष्ण असते. याचे सेवन केल्याने वात आणि कफ दोषापासून आराम मिळतो. आयुर्वेदानुसार, जेव्हा शरीरात वात किंवा कफ दोष वाढतो, तेव्हा शरीरात अनेक आजार होतात. हळद, मेथी आणि सुंठ एकत्र घेतल्याने शरीरात वात आणि कफ बॅलन्स केले जाऊ शकते.

हळद, मेथी आणि सुंठ असे खा

मेथीला हलके भाजून वाटून घ्या, सुंठही मिक्सरमधून वाटून घ्या. मेथी आणि सुंठ पावडर जर एक एक चमचा घेतली असेल तर यात अर्धा चमचा हळत मिक्स करा. हे मिश्रण कोमट पाण्यात एकत्र करा. याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

ही बातमीही वाचा...

साखरेने व्हाल म्हातारे:स्मरणशक्ती कमी होईल, यकृतही खराब; शिल्पा आणि मसाबाचे साखरेला गूडबाय

बातम्या आणखी आहेत...