आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्ट हेल्थ:ही आहेत हार्ट अ‍ॅ​​​​​​​टॅकची 6 लक्षणे, व्यायाम आणि संतुलित आहार हा सर्वोत्तम बचाव

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (५८) यांना १० ऑगस्ट रोजी व्यायामादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, तिथे त्यांची तब्येत आता सुधारत आहे, परंतु गेल्या दोन वर्षांत बॉलीवूड गायक केके (५३, त्यांचे पूर्ण नाव कृष्ण कुमार कुन्नत), दक्षिण चित्रपटांचा सुपरस्टार पुनीत राजकुमार (४६), प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (४०) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग हे गेल्या २० वर्षांत जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण आहेत. हृदयाचे स्नायू पुरेसे रक्त पंप करू शकत नाहीत तेव्हा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी विकार उद्भवतात. यामागे अनेक कारणे असू शकतात. या विकारामुळे हृदयविकार दर्शवणारी अनेक लक्षणे उद्भवतात. काही लोकांमध्ये ही लक्षणे काही महिने किंवा त्यापूर्वीही दिसू शकतात. ही लक्षणे वेळीच समजली तर हृदयविकाराच्या विविध समस्या टाळता येऊ शकतात.

हार्ट अ‍ॅटॅक व त्याच्याशी संबंधित माहिती हवे असे सर्व काही -छातीत दुखणे : रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा व्यायामादरम्यान हृदय स्नायूंना वेगाने रक्त पंप करण्याचा प्रयत्न करते, परंतु ब्लॉकेजमुळे ते तसे करू शकत नाही, त्यामुळे त्यावर दबाव वाढतो. छातीत दुखते.

-छातीत दुखणे : रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा व्यायामादरम्यान हृदय स्नायूंना वेगाने रक्त पंप करण्याचा प्रयत्न करते, परंतु ब्लॉकेजमुळे ते तसे करू शकत नाही, त्यामुळे त्यावर दबाव वाढतो. छातीत दुखते.

-चक्कर येणे : व्हाॅल्व्ह समस्या किंवा ब्लाॅकेज वेगाने उभे राहूनही चक्कर येत असेल तर ते हृदयविकाराचे लक्षण आहे. रक्तदाब झपाट्याने कमी होत असल्याचे हे लक्षण आहे. हृदय पुरेसे जलद रक्त पंप करू शकत नाही.

-अचानक हृदयविकाराचा झटका : या हार्ट अॅटॅकमध्ये आधी लक्षणे दिसत नाहीत. रक्तवाहिन्यांत जमा झालेला प्लेक अचानक तुटल्याने साखळी तयार होते व हार्ट अॅटॅक येतो.

-हळूहळू येणारा हार्ट अ‍ॅटॅक : या स्थितीत रक्तवाहिन्या कालांतराने अरुंद होतात. धमनी ७०% पेक्षा जास्त अरुंद होते तेव्हा लक्षणे दिसू लागतात. विशेषतः प्रसूतीदरम्यान.

-फ्लूसारखी लक्षणे : रक्तप्रवाह कमी होणे शारीरिक हालचालींनंतर मळमळ किंवा थकवा जाणवत असल्यास. थंड, चिकट घाम येत असेल तर ते रक्तप्रवाह कमी झाल्याचे सूचित करते. ही हृदयाशी संबंधित विकारांची लक्षणे आहेत.

-थकवा व निद्रानाश : ऑक्सिजनची उणीव आर्कान्सास विद्यापीठाच्या संशोधनात हृदयविकार असलेल्या अनेक महिलांत आठवडाभर असामान्य थकवा किंवा निद्रानाश दिसून आला. रक्तातील ऑक्सिजनची कमतरता हे एक कारण होते.

काय करावे... व्यायाम : रक्ताभिसरण वाढते, कोलेस्टेरॉल घटते वेगवान चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवणे असे एरोबिक व्यायाम आठवड्यातून ५ दिवस केल्यास हृदयाचे पंपिंग सुधारते. रक्ताभिसरण चांगले होते. रक्तदाब कमी होतो. त्याच वेळी आठवड्यातून किमान दोन दिवस वजन उचलणे किंवा बाॅडी वेट अक्सरसाइज असे प्रतिकार प्रशिक्षण करणेदेखील फायदेशीर आहे.

चांगला आहार : भाज्या आणि संपूर्ण धान्ये २२% धोका कमी करतात पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन के आणि नायट्रेट्स मुबलक प्रमाणात आढळतात, त्यामुळे रक्तदाब कमी होतो. दुसरीकडे, संपूर्ण धान्यांमध्ये उच्च फायबर आढळते, ते वाईट कोलेस्टेरॉल कमी करते. आहारात दररोज १५० ग्रॅम संपूर्ण धान्याचा समावेश केल्यास हृदयविकाराचा धोका २२% कमी होतो.

डॉ. विद्युत जैन कार्डिओलॉजिस्ट, कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे माजी चेअरमन

बातम्या आणखी आहेत...