आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वतःला रोगमुक्त आणि निरोगी ठेवणे ही एक सतत प्रक्रिया आहे, परंतु दैनंदिन जीवनात डोकेदुखी, उचकी, मान आखडणे अशा आरोग्याच्या समस्या उद्भवतात. १० मिनिटांपेक्षा कमी वेळात त्यांचे निराकरण करू शकतील अशा विज्ञानावर आधारित युक्त्या जाणून घ्या.
उचकी : कान बंद करा व एक ग्लास पाणी प्या
यावर उपाय म्हणून जॉन्स हॉपकिन्स चिल्ड्रन सेंटरच्या म्हणण्यानुसार एका मोठ्या ग्लासात पाणी घ्या. आता जोडीदाराला तुमचे कान नीट बंद करून पाणी प्यायला सांगा. असे पाणी गिळल्याने व्हॅगस मज्जातंतू सक्रिय होतो, तो मेंदूकडून डायाफ्रामपर्यंत जैविक संदेश पाठवतो. हा संदेश उचकीसाठी जबाबदार असलेल्या स्नायूंना शांत करतो.
कोरडे डोळे : थंड करून आय ड्राॅप टाका
हॉलीवूडच्या आय सर्जन अॅलन मेंडेलसोहन यांच्या मते, आपल्या डोळ्यांच्या लुब्रिकेशनसाठी आय ड्राॅप वापरले जातात. त्यांचा अधिक फायदा घेण्यासाठी त्यांना काही काळ फ्रीझरमध्ये ठेवा. थंड तापमान ड्रॉपची तरलता बदलते, जेणेकरून ते कॉर्नियाच्या पृष्ठभागावर चांगले वंगण घालते.
मान आखडणे : मध्यम गतीने चालावे
स्टॅमफोर्ड युनिव्हर्सिटीच्या मते, सर्व्हायकल जाॅइंट कडक झाल्यामुळे असे होते. हे सर्व्हायकल जाॅइंट ढिले करण्यासाठी मध्यम गतीने शक्य तितक्या दूरपर्यंत चालावे. आपण मध्यम गतीने चालतो तेव्हा हात नैसर्गिकरीत्या झोके घेतात, त्यामुळे मानेशी संबंधित सर्व स्नायू सक्रिय होतात आणि मानेचा ताण कमी होतो.
डास चावणे : चमचा थंड करून त्या जागी चोळा
कधी कधी डास चावल्यामुळे खाज सुटते. अशा वेळी एक ओला चमचा घ्यावा, तो फ्रीझरमध्ये ५ मिनिटे ठेवावा. यानंतर तो थंड चमचा डास चावलेल्या जागेवर हलक्या हातांनी चोळा. थंड तापमानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे डासांची लाळ आणि रोगप्रतिकारक शक्तीने बनवलेले हिस्टामाइन जास्त पसरत नाही. खाज कमी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.