आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आरोग्य :रक्तदाबाची समस्या दूर करायची आहे? तर अवश्य करा हे उपाय 

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उच्च रक्तदाबाच्या समस्येकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं

उच्च रक्तदाबाच्या समस्येने ग्रस्त असाल तर काही घरगुती उपाय करू शकता. पण, या समस्येकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.उच्च रक्तदाबाच्या समस्येकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. या आजाराला सायलेंट किलर असंही म्हणतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. तसेच याव्यतिरिक्त काही घरगुती उपायही रक्तदाबाची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. जाणून घेऊया काही घरगुती उपाय...

  • उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शनच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी सर्वात आधी तुमची जीवनशैली बदलावी लागेल. जर वेळीच या समस्येकडे लक्ष दिलं नाही तर ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. सुरुवातीलाच रक्तदाब समस्या जाणवत असेल तर काही घरगुती उपाय करू शकता पण, जर त्रास जास्त होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.
  • रक्तदाब वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, टेन्शन किंवा तणाव. त्यामुळे स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्वात आधी आहारातील मिठाचं प्रमाण कमी करा. जास्त मिठाचं सेवन केल्याने ब्लड प्रेशरची समस्या वाढते. त्यामुळे याकडे लक्ष द्या. तसेच तेलकट पदार्थ खाणंही टाळा.
  • लसणाचा करा आहारात समावेश करा. लसूण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. याचं सेवन केल्याने हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासोबतच इतर आजारांपासूनही बचाव होतो. लसूण ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्तम घरगुती उपाय आहे. लसूण शरीरातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवतं. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही मदत करतो. तुम्ही लसूण पाण्यासोबतही खाऊ शकता. जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर तुमच्या आहारामध्ये लसणाचं प्रमाण वाढवा.
  • काळी मिरीही ठरते फायदेशीर फायदेशीर ठरतात. काळी मिरीही रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी गुणकारी ठरते. जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर अर्धा ग्लास पाण्यात काळ्या मिरीची पावडर एकत्र करा आणि त्याचं सेवन करा. तसेच आहारातही याचा समावेश करा. काळी मिरी पचनक्रिया सुरळीत होण्यासाठीही मदत करते. तसेच दात आणि डोळ्यांसाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे काळ्या मिरीचं नियमित सेवन सुरू करा. याव्यतिरिक्त आवळ्याची पावडर आणि कांद्याचं सेवनही ब्लड प्रेशरवर फायदेशीर ठरतं.
0