आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वातावरण बदलांमुळे व्हायरल फीव्हरच्या समस्येत वाढ होताना दिसत आहे. लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसांच्या आरोग्यावर बदलणाऱ्या वातावरणाचा लगेच परिणाम होतो. अशातच जगभरात कोरोना व्हायसरचा प्रार्दुभाव वाढल्यामुळे आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. व्हायरल फीव्हरपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय करणे आवश्यक असते. जाणून घेऊया व्हायरल फीव्हरची लक्षणं आणि त्यापासून बचाव करण्यासाठीचे उपाय...
व्हायरल फीव्हरची लक्षणं :
व्हायरल फीव्हर असेल तर शरीरामध्ये काही खास लक्षणं दिसून येतात. या लक्षणांमध्ये घशात खवखव, डोकेदुखी, सांधेदुखीसोबतच उल्टी होणं यांसोबतच डोळे लाल होणं आणि ताप येणं यांसारखी लक्षणं दिसून येतात. व्हायल फीव्हरचा संसर्ग लहान मुलं आणि वयोवृद्धांना लगेच होतो. त्यामुळे यावर तत्काळ उपाय होणं गरजेचं आहे.
त्वरित औषध घेणं टाळा :
व्हायरल फीव्हर झाल्यानंतर लगेच औषध घेत असाल तर तसं अजिबात करू नका. आहारात द्रव पदार्थांचं प्रमाण वाढवा. त्यामध्ये पाणी, सूप, चहा, नारळ पाणी आणि डाळीचं पाणी या पदार्थांचा आहारात समावेश करा. परंतु, एक लक्षात ठेवा, जर लक्षणं जास्त वाढली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
घरगुती उपायही ठरतात फायदेशीर :
व्हायरल ताप आल्यानंतर औषधांऐवजी काही घरगुती उपाय करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. या समस्या दूर करण्यासाठी मध, आलं आणि हळद अत्यंत गुणकारी ठरते. आलं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. यामध्ये अॅन्टीफ्लेमेबल, अॅन्टिऑक्सिडंट आणि असे अनेक गुणकारी तत्त्व असतात. ज्यामुळे व्हायरल तापपासून सुटका करण्यास मदत मिळते. आलं, हळद आणि मध एकत्र करून काढा तयार करा. याचं सेवन केल्याने व्हायरल समस्यांपासून सुटका करण्यास मदत होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.