आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात गरम पाणी सांभाळून प्या:किडनीवर ताण येईल; आतड्यांना इजा होईल

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात उष्णतेसाठी अनेकदा लोक गरम पाणी पितात. थंडी जशी वाढते, तसे जास्त गरम पाणी प्यायला लागतात. मात्र दीर्घकाळ असे करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. घसा साफ करून ऊबदारपणा देणारे गरम पाणी शरीराच्या आतील अवयवांना नुकसान पोहोचवू शकते. सोबतच यामुळे अनिद्रा, बीपी आणि किडनीची समस्याही होऊ शकते. अशात पिण्याच्या पाण्याचे योग्य तापमान आणि प्रमाण जाणून घेणे गरजेचे आहे.

बातमीत पुढे जाण्यापूर्वी जाणून घ्या की, सकाळी एक ग्लास कोमट पाणी पिणे धोकादायक नाही, तर फायदेशीर आहे. आपण पुढे गरजेपेक्षा जास्त गरम पाणी किंवा वारंवार गरम पाणी पिण्याच्या नुकसानांविषयी बोलणार आहोत.

दीर्घ काळासाठी गरम पाणी पिणे पोट आणि अंतर्गत अवयवांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे नाजूक अवयव भाजू शकतात.
दीर्घ काळासाठी गरम पाणी पिणे पोट आणि अंतर्गत अवयवांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे नाजूक अवयव भाजू शकतात.

गरम पाणी फिल्टर करणे किडनीसाठी कठीण

न्युट्रिशनिस्ट कोमल सिंह सांगतात की, 'आपले किंवा कोणत्याही सजीवाचे शरीर नॉर्मल पाणी पचवू शकते. जास्त थंड किंवा गरम पाणी आपल्या शरीरासाठी नॉर्मल नाही. डॉक्टरांच्या मते गरम पाणी फिल्टर करण्यासाठी किडनीला जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे किडनी योग्यरित्या काम करू शकत नाही.'

कोरोनादरम्यान लोक खूप गरम पाणी प्यायले, आजारी पडले

कोरोनादरम्यान सोशल मीडियावर मेसेज सर्क्युलेट झाले. ज्यात दावा करण्यात आला की, गरम पाणी प्यायल्याने शरीरातील कोरोना व्हायरस नष्ट होतो. यानंतर लोक जास्तीत जास्त गरम पाणी प्यायला लागले. यामुळे लोकांच्या आरोग्यावर यााच वाईट परिणाम झाला.

घसा, पोट आणि आतड्यांना इजा होऊ शकते

दीर्घकाळ गरम पाणी पिल्याने घसा, पोट आणि आतड्यांना इजा होऊ शकते. आपल्या शरीराच्या अंतर्गत पेशी खूप नाजूक असतात. गरम पाणी त्यांना जखमी करू शकते. गरम पाण्याने अनेकदा अॅसिडिटीची समस्याही होते. पोटात जळजळ होते. गरम पाणी पचनसंस्थेचेही नुकसान करते. यामुळे आतड्यांचा पृष्ठभाग थेट विकरांच्या संपर्कात येतो. यामुळे गरम पाण्याने शरीरात सूज येण्याची समस्याही दिसते.

हिवाळ्यात गरम पाणी थोड्या प्रमाणात चहासारखे पिऊ शकता. सकाळी कोमट पाणी फायदेशीर आहे.
हिवाळ्यात गरम पाणी थोड्या प्रमाणात चहासारखे पिऊ शकता. सकाळी कोमट पाणी फायदेशीर आहे.

रात्री गरम पाणी पिल्यास झोप येणार नाही

रात्री गरम पाणी पिण्याने झोप न येण्याचा त्रास होऊ शकतो. गरम पाणी पिल्याने रात्री वारंवार लघवी येऊ शकते. यामुळे झोपमोड होते.

गरम पाण्याचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा जास्त असते. ज्यामुळे हे पाणी शरीराचा रक्तदाबही वाढवते.

सकाळी कोमट पाणी प्या, इतर वेळी नॉर्मल

जम्मूतील आयुर्वेदाचार्य अभिषेक उपाध्याय यांच्यानुसार सकाळी कोमट पाणी पिणे फायदेशीर आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ होते. सकाळी कोमट पाणी पिण्याचे अनेक पायदे आहेत. यानंतर इतर वेळी नॉर्मल पाणी पिणे फायदेशीर आहे.

जर जास्त थंडी आहे आणि गरम पाणी पिण्याची इच्छा झाली तर ते चहासारखे घोटा-घोटाने प्यायला हवे. हिवाळ्यात दिवसातून 2 ते 3 कप गरम पाणी प्यायले जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...